अमोल शिंदे हे नाव आज समाजात विश्वास, समर्पण आणि प्रामाणिकतेचं प्रतीक बनलं आहे.
सामान्य कुटुंबातून आलेले, संघर्षातून उभे राहिलेले आणि प्रत्येक क्षणी समाजासाठी कार्यरत असलेले — हेच त्यांच्या जीवनाचं खरं सार आहे.
त्यांनी आपल्या कार्यातून हे सिद्ध केलं आहे की समाजसेवा म्हणजे केवळ शब्द नव्हे, तर कृतीतून दिसणारा आदर्श आहे. सामाजिक कार्याची दिशा अमोल शिंदे यांनी शिक्षण, आरोग्य, पर्यावरण, उद्योजक घडवणे, आणि समाजविकास या सर्व क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान दिलं आहे.
त्यांनी “जनतेसाठी, समाजासाठी” या तत्त्वज्ञानातून अनेक उपक्रम यशस्वी झाले.
गरीब व गरजू विद्यार्थ्यांना वही, पुस्तकं, शालेय साहित्य वितरण, ग्रामीण भागात स्वच्छता अभियान, वृक्षारोपण मोहीम, पाणी बचत जनजागृती, सामाजिक संस्थांमार्फत रक्तदान शिबिरं, आरोग्य तपासणी शिबिरं, महिलांसाठी स्वयंरोजगार प्रशिक्षण आणि सक्षमीकरण कार्यक्रम, युवा पिढीसाठी उद्योजकता मार्गदर्शन आणि रोजगार संधींचं नियोजन अशा अनेक उपक्रमांमध्ये त्यांनी केवळ आयोजकाची भूमिका निभावली नाही, तर स्वतः प्रत्यक्ष सहभाग घेतला.
“लोकांसोबत राहून लोकांसाठी काम करणं” — हा त्यांचा ठाम विश्वास आहे.
जनसंपर्क आणि नेतृत्व- अमोल शिंदे यांच्या कार्यशैलीत आदर, समन्वय आणि संवाद ही तीन मुख्य तत्त्वं आहेत.
“राजकीय वरिष्ठांशी आदरपूर्वक संबंध ठेवत आणि युवा पिढीशी घट्ट नातं जपत, ते सर्वांना सोबत घेऊन प्रगतीचा मार्ग तयार करत आहेत.
ते नेहमी म्हणतात — “समाजाचा विकास एकट्याचा नाही, तर सर्वांचा एकत्र प्रयत्न असतो.”
अमोल शिंदे यांचा उद्देश स्पष्ट आहे.
“समाजातील प्रत्येक घटकाला सशक्त करायचं आणि युवांना देशाच्या विकासासाठी तयार करायचं.” आगामी काळात अधिक व्यापक सामाजिक मोहिमा राबवण्याचा संकल्प अमोल शिंदे बाळगतात. त्यांचं ब्रीदवाक्य आहे.
“आदर वरिष्ठांचा, साथ जनतेची आणि दिशा विकासाची.”

0 टिप्पण्या