Vihann News

भाळवणीतील बिबट्याच्या मृत्यूचे गुढ उकलले

जून २४, २०२५

 

भाळवणी (महादेव धनवडे) : भाळवणी ता.खानापूर येथील घोल मळा रोडला असणाऱ्या शुभम धनवडे यांच्या विहिरीजवळ मृत अवस्थेतील बिबट्या आढळून आला होता.

दरम्यान आज बिबट्याचा शवविच्छेदन अहवाल समोर आला असून त्यामध्ये निमोनिया ने फुफ्फुसाला इन्फेक्शन होऊन अवयव निकामी झाल्याचे तपासात निष्पन्न झाले. बिबट्याचा मृत्यू झाला असल्याचे वन अधिकारी फिरोज शिकलगार यांनी सांगितले.