Vihann News
728x90 Ad Slot

दिपक माळींनी घेतली भाळवणीतील सहा विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची जबाबदारी

जुलै ०९, २०२६

भाळवणी - महादेव धनवडे/ काही दिवसापूर्वी तुंग फाट्याजवळ झालेल्या अपघातामध्ये मृत्युमुखी पडलेल्या कै.ऋषिकेश दिपक माळी याचा आठ जुलै रोजी वाढदिवस होता. त्याच्या स्मृतींना उजाळा म्हणून येथील जिल्हा परिषद केंद्र शाळा भाळवणी येथे दिनांक- 8/ 7/ 2026 बुधवार रोजी भाळवणी येथे ऋषिकेश चे वडील श्री.दीपक(दादा) माळी व माजी सभापती वैशाली(ताई) माळी यांनी आपले चिरंजीव कै.ऋषिकेश दीपक माळी यांच्या वाढदिवसानिमित्त जि.प. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप केला असून इयत्ता पाचवी व सहावी मधील सहा विद्यार्थ्यांना माध्यमिक व उच्च शिक्षणाची सर्व जबाबदारी घेतली असून त्यांचा संपूर्ण पुढील शिक्षणाचा खर्च ते स्वतः करणार आहेत तसेच या प्रसंगी दत्तक विद्यार्थ्यांना वह्या वाटप करण्यात आल्या असून श्री/सौ माळी दाम्पत्य यांचे सर्व शिक्षक स्टाफ, शाळा व्यवस्थापन समिती व माजी विद्यार्थी संघ यांच्यामार्फत त्यांच्या स्तुत्य उपक्रमास मानाचा सलाम व खूप खूप आभार मानले सदर कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. मारुती सूर्यवंशी माजी विद्यार्थी संघ अध्यक्ष श्री. संतोष साळुंखे, गावातील प्रतिष्ठित नागरिक, शाळेतील शिक्षक व दत्तक घेतलेल्या विद्यार्थ्यांचे पालक उपस्थित होते श्री. संजय शिंदे सर यांनी सर्व मान्यवरांचे व श्री. दीपक (दादा) माळी यांचे आभार मानले व कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.