भाळवणी : भाळवणी ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्ताने भाळवणीत जोरदार राजकीय धुरळा उडत असून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत.भाळवणीच्या प्रभाग चार मधून उच्चशिक्षित उमेदवार असलेले दिशांत दिनकर धनवडे यांनी महाविकास आघाडी प्रणित स्वाभिमानी ग्रामविकास पॅनेलकडून उमेदवारी जाहीर केली असून त्यांच्या प्रचाराचा जोरदार धडाका सुरू आहे.
भाळवणी तील राजकारण असो वा समाजकारण यामध्ये प्रामुख्याने अग्रेसर असणारे,या अलीकडच्या काळात एक आक्रमक,कामाचा माणूस आणि धडाडीचे वक्ते म्हणून चर्चेत असणारे दिशांत धनवडे हे (MSc. B.Ed.) शिक्षण घेतलेले आहेत.वय जरी लहान असले तरी ज्या गोष्टीची आवड आहे ती साध्य करता आली पाहिजे हे दिसून येते दिशांत सरांच्या प्रवासातून कारण त्याची आवड होती समाजकारण व राजकारण करून लोकांना मदत करायची.
दिशांत धनवडे यांच्या कार्याची सुरवात झाली ती म्हणजे S.G.M.कॉलेज कराड पासून.तेथे ते इलेक्ट्रॉनिकस विषय शिकवायचे आणि त्याचबरोबर गरीब विद्यार्थ्यांसाठी झटून त्याच्या फी मध्ये सवलत मिळवून द्यायचे,त्यांच्या प्रत्येक अडचणीच्या काळात उभा राहायचे. हे असेच काम करत त्यांनी त्या कॉलेज वर स्वतःची छाप उमटवली त्यानंतर त्यांनी modern कॉलेज विटा येथे शिक्षक म्हणून पुनःश्च एकदा कामाला सुरुवात केली येथे त्यांनी बरेच वर्ष काम केले आणि खरे म्हणल तर वक्ता होण्यासाठी सुद्धा या कॉलेज पासून सुरुवात झाली या कॉलेज मध्ये सुद्धा त्याची विद्यार्थ्यांविषयी कळवळ आणि तळमळ अशीच सुरू होती.
दिशांत धनवडे यांचा प्रामुख्याने कौटुंबिक व्यवसाय म्हणजे दूध संकलनाचा,यातून वेळ कमी भेटू लागल्यामुळे त्यांनी कॉलेज सोडून फक्त व्यवसायाकडे लक्ष दिले पण त्यांची समाजातील अडचणीकडे धाव घेऊन ती संपुष्टात आणण्याची भुक काही थांबली नव्हती म्हणून यानंतर थोड्याच दिवसात त्यांनी दिपदिव्य फाऊंडेशन उभा केले यामध्ये सर्वात प्रभावी काम म्हणजे 11 गरीब मुलीच्या शिक्षणाचा विनामूल्य केलेला खर्च तसेच त्यांनी पूरग्रस्तांनपासून ते आता चालू असलेल्या कोरोनाच्या काळात भरभरून मदत केली अनेक कंपन्याना फाऊंडेशन मार्फत पुरग्रस्तांसाठी मदतीचा हात मागतीला आणि मदत आली सुद्धा,कोरोनाच्या काळात पेशंट ना बेड मिळवून देणे असो, त्याना स्वतः हॉस्पिटलमध्ये घेऊन जाणे असो,तसेच कोरोना काळात गावातील एक ही व्यक्ती लसीकरणापासून वंचित राहू नये यासाठी लसीकरनाच्या पहिल्या दिवसापासून ते लसीकरण पूर्ण होईपर्यंत त्यांनी स्वतःचा विचार न करता गावामध्ये जास्तीत लसीकरण कसे होईल याकडे लक्ष्य दिले .
भाळवणीतील कोणत्याही व्यक्ती चे शाळेचे किंवा महाविद्यालयाचे काम असो नाहीतर पोलीस स्टेशन,तहसील कार्यालय,जिल्हाधिकारी कार्यालय,तलाठी कार्यालय , ग्रामपंचायत कार्यालय याठिकाणी वेळीप्रसंगी आंदोलन करून भाळवणीतील लोकांना न्याय देण्याचे काम तसेच यासारख्या अनेक गोष्टीत मदतीसाठी ते अग्रेसर भूमिका घेवून असतात.
त्यांना समाजकारणाबरोबर राजकारणाची भरपुर आवड आहे त्यामुळे राजकारणातील जिल्हा असो वा तालुका त्यांच्या वक्तृत्वाची तोफ प्रत्येक सभेत वाजतच असते.
र हा माणूस एवढं शिक्षण घेऊन कोणतेही पद नसताना समाजासाठी त्यांच्या न्यायासाठी झटत असेल तर सुज्ञ मतदारांनी सुद्धा विचार केला पाहिजे.या जनतेसाठी झटणाऱ्या माणसाला कोणत्या ना कोणत्या पदावर नेऊन ठेवले पाहिजे , यासाठीच त्यांना भाळवणी ग्रामपंचायत मधील वार्ड क्र.४ मधून सर्व पॅनेल सहित निवडून आणायचे आहे.


0 टिप्पण्या