विट्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार: चौघांवर गुन्हा, दोघे अटकेत


विटा शहरात एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेने खानापूर तालुक्यासह परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणी विटा पोलिसांनी चौघांविरोधात गुन्हा दाखल केला असून, दोघांना अटक करण्यात आली आहे. पीडित मुलगी अल्पवयीन असल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.
विटा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षभरापासून गणेश वाघमारे (रा. विटा) याने पीडित मुलीच्या इच्छेविरुद्ध तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. तसेच, त्याने पीडितेला धमकावून आपल्या घरी नेले आणि वेळोवेळी तिच्यावर बलात्कार केला.
या घटनेनंतर काही दिवसांनी, पीडिता आणि तिची बहीण शेतात जात असताना, गणेश वाघमारेचा मित्र सोमनाथ आवळे मोटरसायकलवर त्यांच्याजवळ आला. 'तुम्हाला शेतात सोडतो' असे सांगून त्याने दोघींना मोटरसायकलवर बसवले. त्याचवेळी सोमनाथ आवळे याने त्याचे मित्र शरद आणि दिलीप यांना चिखलहोळ आणि माहुली येथील माळावर बोलावून घेतले.
यावेळी सोमनाथ आवळे याने पीडित मुलीला 'माझ्याशी लग्न कर' असे म्हटले असता, तिने नकार दिला. त्यानंतर, सोमनाथ आवळेचे मित्र शरद आणि दिलीप यांनी पीडित मुलीचा विनयभंग केला. त्याचवेळी सोमनाथ आवळे यानेही तिच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवले.
या प्रकारानंतर पीडित मुलीने विटा पोलिस ठाण्यात या चौघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी गणेश वाघमारे आणि सोमनाथ आवळे या दोघांना अटक केली असून, पुढील तपास विटा पोलिस करत आहेत. पीडित मुलगी अल्पवयीन असल्याने या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या