नेव्हिगेशन मेनू

27 डिसेंबरला होणाऱ्या कोल्हापुरातील प्रदेश संमेलनात विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सहभाग

sbmarathi By sbmarathi
| डिसेंबर ११, २०२२

 


तासगाव (प्रतिनिधी) : भारतीय पत्रकारांची राष्ट्रीय संघटना अर्थात ऑल जर्नलिस्ट अँड फ्रेंड सर्कलचे 17 वे प्रदेश संमेलन 27 डिसेंबरला कोल्हापुरात होत आहे.  या संमेलनामध्ये विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती लाभणार आहे.

आंतरराष्ट्रीय पत्रकार जतीन देसाई यांच्या हस्ते प्रदेश संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. ज्येष्ठ पत्रकार सचिन परब यांच्या अध्यक्षतेखाली होऊ घातलेल्या प्रदेश संमेलनामध्ये माहिती व जलसंपर्क विभागाचे उपसंचालक डॉ संभाजी खरात यांचे उपस्थित पत्रकार मित्रांकरिता बदलती पत्रकारिता आणि आव्हाने यासह अन्य विषयावर प्रमुख मार्गदर्शनपर व्याख्यान होणार आहे.

कोल्हापुरातील दसरा चौकातील राजर्षी शाहू महाराज स्मारक या ठिकाणी हे प्रदेश संमेलन होणार आहे.

ऑल जर्नलिस्ट अँड फ्रेंड सर्कल परिवारातील सदस्य,पत्रकार बांधवांनी उपस्थित राहावे असे आवाहन संघटनेचे संस्थापक अध्यक्ष यासीन पटेल,संघटनेचे केंद्रीय अध्यक्ष गणेश कोळी यांनी केले आहे.