Vihann News
728x90 Ad Slot

एक-दोन पावले मागे घेण्यास तयार भाळवणी गावच्या भल्यासाठी निवडणूक बिनविरोध करूया : संजय मोहिते

डिसेंबर ०६, २०२२

एक-दोन पावले मागे घेण्यास तयार भाळवणी गावच्या भल्यासाठी निवडणूक बिनविरोध करूया :  संजय मोहिते यांचे विरोधकांना आवाहन



भाळवणी एक्सप्रेस - भाळवणी ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी अर्ज माघारी घेण्याचा शेवटचा दिवस उरला असताना पंचायत समिती सदस्य संजय मोहिते यांनी समन्वयाची भूमिका घेण्याचे विरोधकांना आवाहन केले असून भाळवणी गावच्या भल्यासाठी आपण एक दोन पावले मागे घेण्यास तयार असून निवडणूक बिनविरोध करण्याचे आवाहन त्यांनी विरोधकांना केले आहे.


भाळवणी ग्रामपंचायतीच्या 15 सदस्य पदासाठी 66 अर्ज आले आहेत तर सरपंच पदासाठी सात अर्ज दाखल झाले आहेत. यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना संजय मोहिते म्हणाले की, भाळवणी गावची निवडणूक लक्षात घेता तरुणांमध्ये संघर्षमय वातावरण निर्माण होऊ नये तसेच गावच्या विकासासाठी सर्व राजकीय पक्षांना मी आवाहन करू इच्छितो की ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी एक दोन पावले आम्ही मागे घेण्यासाठी तयार आहोत आमच्या राजकीय विरोधकांना ही या निमित्ताने सांगू इच्छितो की तुम्ही सुद्धा एक दोन पावले मागे या जेणेकरून गावाच्या विकासासाठी सर्वजण एकत्र आलात तर खानापूर तालुक्यात एक आदर्श गाव निर्माण करण्यासाठी भाळवणी गावास संधी प्राप्त होईल.


या निमित्ताने मी नम्र आवाहन करतो की सर्वजण एकत्र येऊयाआणि भाळवणी गावाचा विकास साधूया असे यावेळी ते म्हणाले.