Vihann News
728x90 Ad Slot

आटपाडीत ओढ्यामध्ये सापडल्या 500 रुपयांच्या नोटा; नागरिकांची गर्दी

ऑक्टोबर १९, २०२४

आटप्पाडी ग. दी. माडगुळकर उद्यानासमोरून जाणाऱ्या नाल्याच्या पाण्यात ५०० रुपयांच्या नोटा वाहून गेल्याचे समोर आले आहे. या 500 रुपयांच्या नोटा शनिवारी बाजारात आलेल्या लोकांना सापडल्या.


सांगलीतील आटपाडी ग. दी. माडगुळकर उद्यानासमोरून पाण्याचा प्रवाह जातो. त्यातच शनिवारी अचानक मोठ्या प्रमाणात 500 रुपयांच्या नोटा तरंगताना दिसल्या. या नोटा घेण्यासाठी येथील बाजारात येणारे लोक गर्दी करताना दिसत होते. काही लोकांना या नोटा मोठ्या प्रमाणात सापडल्या होत्या. हे पाहण्यासाठी अनेकांची गर्दी झाली होती. या नोटा कोठून आल्या आणि कोणी नदीत फेकल्या, याबाबत अद्याप कोणतीही माहिती नसली तरी, अशी चर्चा परिसरात सुरू आहे.