नेव्हिगेशन मेनू

दसऱ्याच्या मुहूर्तावर विटा सुधारित नळपाणी पुरवठा योजनेचे भुमिपूजन

sbmarathi By sbmarathi
| ऑक्टोबर १०, २०२४

स्वर्गीय आमदार अनिलभाऊ बाबर यांच्या प्रयत्नांनी आणि युवक नेते अमोलदादा बाबर व सुहासभैया बाबर यांच्या पाठपुराव्यामुळे विटा शहराला पिण्याच्या पाण्यासाठी स्वयंपूर्ण करण्यासाठी मंजूर झालेल्या तब्बल 88 कोटी 11 लाखांच्या रुपयांच्या सुधारीत नळपाणी पुरवठा योजनेचा भूमिपूजन सोहळा शनिवार 12 ऑक्टोबर रोजी जुन्या नगरपालिके समोर दगडी पाण्याची टाकी, गांधी चौक विटा येथे सकाळी 10.00 वाजता होणार आहे.

विटा सुधारित नळपाणी पुरवठा योजनेची वैशिष्ट्ये

* या योजनेचा उद्भव वाझर या ठिकाणाहून घेण्यात आलेला आहे. या तलावाला टेंभू योजने चे फीडिंग आहे.

* या योजनेत 7.5 किलोमीटर ची उर्ध्ववाहिनी वाझर तलावापासून ते आळसंद जलशुध्दीकरण प्रकल्प पर्यंत प्रस्तावित केली आहे. त्याचप्रमाणे अस्तित्वातील योजनेमधील 28 किलोमीटर लांबीच्या उर्ध्व वाहिनी पैकी 9.55 किलोमीटर लांबीची पाइपलाइन बदलण्याचे प्रस्तावित केले आहे. दहा दशलक्ष घनमीटर चे नवीन जलशुद्धीकरण केंद्र प्रस्तावित केले आहे. या योजनेत विविध व्यासाच्या 76 कि.मी.च्या वितरण वाहिन्या प्रस्तावित केल्या आहेत.

* या योजनेत 4.75 लक्ष लिटर क्षमतेची मुख्य संतुलन टाकी प्रस्तावित आहे. तसेच विविध क्षमतेच्या चार उंच साठवण टाक्या प्रस्तावित केलेल्या आहेत. ऑटोमेशन प्रस्तावित केलेले आहे. आळसंद जलशुद्धीकरण केंद्राच्या जागेवर सौर ऊर्जा प्रकल्प तसेच स्काडा आणि या योजनेमध्ये शुद्ध पाण्याची 15.5 किमीच्या उर्ध्व वाहिनी प्रस्तावित केलेली आहे. 

* शुद्ध पाण्याची 12.8 किमीच्या गुरुत्ववाहिनी प्रस्तावित केलेली आहे.

* 135 ली. प्रति माणशी शुद्ध व पुरेसा पाणी पुरवठा होणार

* विटा शहराची 2051 सालची लोकसंख्या गृहीत धरुन तयार केली योजना.