Vihann News
728x90 Ad Slot

दसऱ्याच्या पूर्वसंध्येला शिंदे सरकारची सुवर्णभेट

ऑक्टोबर ११, २०२४


मुंबई :
राज्यात लवकरच विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याची शक्यता असताना दुसरीकडे शिंदे सरकारने दसऱ्याच्या पूर्वसंध्येला लाडक्या बहिणींना भेट दिली आहे. लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार आता लाडकी बहीण योजनेचा अर्ज १५ ऑक्टोबरपर्यंत करता येणार आहेत.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

आतापर्यंत या योजनेचा लाभ न मिळालेल्या महिलांपर्यंत पोहोचण्यासाठी ही मुदतवाढ देण्यात आली आहे. या योजनेत 15 ऑक्टोबर 2024 रोजी रात्री बारा वाजेपर्यंत अर्ज करता येणार असून, अर्ज फक्त अंगणवाडी सेविका यांच्यामार्फतच सादर करायचा आहे.

आमचे सरकार हे लाडक्या बहिणींच्या पाठीशी उभे राहणारे सरकार आहे, त्यामुळे आम्ही एका क्लिकवर लाडक्या बहिणींच्या खात्यात ऑक्टोबर आणि नोव्हेंबरचे पैसे भरले आणि आमचे सरकार बहिणींच्या खात्यावर हप्ते भरणारे सरकार आहे, असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला. सरकार जे हप्ते घेते.

शिंदे म्हणाले की, लाडकी बहिन योजना सुपरहिट झाली असून विरोधकांचे तोंड काळे झाले आहे, असे म्हणत प्रसिद्ध गायिका आशाताई भोसले यांनीही विरोधकांना चांगलीच चपराक दिली. ही योजना यशस्वीपणे राबवून गरिबांची मुले वंचित राहू नयेत, अशी जबाबदारी सरकारने घेतली आहे. या योजनेची कोणी दिशाभूल केली तर लाडक्या बहिणींनो आगामी निवडणुकीत तुमच्याशिवाय राहणार नाही, असेही शिंदे म्हणाले.