Vihann News
728x90 Ad Slot

सेवानिवृत्त शिक्षकाचा जोंधळखिंडी येथील शेतात बुडून मृत्यू

ऑक्टोबर ०९, २०२४
विटा : लेंगरे येथील सेवानिवृत्त शिक्षकाचा जोंधळखिंडी येथील शेतात बुडून मृत्यू झाला. कैलास उर्फ रामचंद्र विठोबा शिंदे (वय 62) असे मृताचे नाव आहे. ही घटना बुधवारी (दि. ९) सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास उघडकीस आली. याबाबत जोंधळ खिंडीचे पोलीस पाटील चंद्रकांत मधुकर घाडगे यांनी या घटनेची वर्दी विटा पोलिसांना दिली.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, खानापूर तालुक्यातील लेंगरे येथील कैलास शिंदे यांचे जोंधळखिंडी गावात शेत आहे. या शेतात त्यांनी मोठे शेततळे बांधले आहे. त्यात मत्स पालन केले होते. मंगळवारी दुपारी ते लेंगारे येथून  घरातून दुचाकीवरून शेताकडे जात असल्याचे सांगून  निघाले होते. मात्र रात्री उशिरापर्यंत ते परत न आल्याने नातेवाईकांनी शोधाशोध सुरू केली.

बुधवारी सकाळी त्यांची दुचाकी शेताजवळ आढळल्याने ग्रामस्थांना संशय आला.  त्यानंतर शेतात शोधाशोध सुरू करण्यात आली.  सकाळी नऊच्या सुमारास त्यांचा मृतदेह शेतात आढळून आला.  शेतात पडल्याने त्यांचा मृत्यू झाला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे.  घटनेची माहिती मिळताच विट्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांच्यासह पोलीस पथकाने जोंधळखिंडी येथील घटनास्थळी भेट दिली.  मृत कैलास शिंदे हे मुंबईत शिक्षक म्हणून कार्यरत होते.  त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगी असा परिवार आहे