Vihann News
728x90 Ad Slot

राष्ट्रवादी शरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर

ऑक्टोबर २७, २०२४

 

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून तिसरी यादी जाहीर करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी तिसरी यादी जाहीर केली. आतापर्यंत दोन याद्यांमध्ये ६८ उमेदवार जाहीर करण्यात आले आहेत. तर आता ९ उमेदवार जाहीर केले. ७७ उमेदवारांपैकी ११ जागांवर महिला उमेदवार दिले असल्याचं प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितलं. अणूशक्तीनगरमधून राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाने अभिनेत्री स्वरा भास्कर हिचा पती फहाद अहमद यांना उमेदवारी दिली आहे.


राष्ट्रवादीच्या तिसऱ्या यादीतील उमेदवार

हिंगणा - रमेश बंग

अणूशक्तीनगर - फहाद अहमद

चिंचवड - राहुल कलाटे

भोसरी - अजित गव्हाणे

माजलगाव - मोहन जगताप

परळी - राजेसाहेब देशमुख

मोहोळ - सिद्धी रमेश कदम

कारंजा - ज्ञायक पटनी

हिंगणघाट - अतुल वांदिले