Vihann News
728x90 Ad Slot

शरद पवार गटाचे मतदारसंघ ठरले, उमेदवार ठरले…; संभाव्य उमेदवारांची यादी

ऑक्टोबर १८, २०२४


विधानसभा निवडणुकीत शरद पवार कुणाला मैदानात उतरवणार? कोणत्या मतदारसंघात कुणाला उमेदवारी दिली जाणार? शरद पवार गटाची संभाव्य उमेदवार यादी, वाचा सविस्तर बातमी...

विधानसभा निवडणुकीची घोषणा झाली आहे. दोन्ही आघाड्यांचं जागावाटप अंतिम टप्प्यात आहे. अशातच कोणत्या मतदारसंघातून कोण निवडणूक लढणार? याची राजकीय वर्तुळात चर्चा होत आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवारांची संभाव्य यादी SB मराठीच्या हाती लागली आहे. कोणत्या विधानसभा मतदारसंघात कोण निवडणूक लढवणार? याची संभाव्य यादी समोर आली आहे. यात बारामतीतून कोण उमेदवार असणार हे स्पष्ट झालेलं नाही. पण इतर जागांवरील उमेदवारांची नावं समोर आली आहेत. 40 हून जास्त जागांवर शरद पवार कुणाला उमेदवारी देणार? याची संभाव्य यादी…

शरद पवार गटाची संभाव्य उमेदवार यादी

इस्लामपूर- जयंत पाटील

तासगाव कवठे महांकाळ- रोहित पाटील

शिराळा- मानसिंग नाईक

उत्तर कराड- बाळासाहेब पाटील

कोरेगाव- शशिकांत शिंदे

फलटण – दीपक चव्हाण

माण खटाव- प्रभाकर देशमुख

शिरुर- अशोक पवार

जुन्नर- सत्यशील शेरकर

इंदापूर- हर्षवर्धन पाटील

आंबेगाव- देवदत्त निकम

वडगाव शेरी- बापू पठारे

दौंड- रमेश आप्पा थोरात

माळशिरस- उत्तमराव जानकर

कर्जत जामखेड- रोहित पवार

काटोल- अनिल देशमुख

विक्रमगड- सुनील भुसारा

घनसावंगी – राजेश टोपे

बीड- संदीप क्षीरसागर

मुंब्रा- जितेंद्र आव्हाड

जिंतूर- विजय भांबळे

अहेरी- भाग्यश्री अत्राम

सिंदखेड राजा- राजेंद्र शिंगणे

उदगीर- सुधाकर भालेराव

घाटकोपर पूर्व- राखी जाधव

परळी- राजाभाऊ पड

लक्ष्मण पवार- गेवराई

आष्टी- भीमराव धोंडे

केज- पृथ्वीराज साठे

माजलगाव- रमेश आडसकर

राहुरी- प्राजक्त तनपुरे

देवळाली- योगेश घोलप

दिंडोरी – गोकुळ झिरवाळ

मुक्ताईनगर – रोहिणी खडसे

जामनेर- गुलाबराव देवकर

अकोला- अमित भांगरे

पारनेर- राणी लंके

खानापूर – सदाशिव पाटील

चंदगड- नंदाताई बाभूळकर

इचलकरंजी- मदन कारंडे