Vihann News
728x90 Ad Slot

वैभव पाटील नावाचे वादळ मतदार संघात परिवर्तन घडवणार

ऑक्टोबर १८, २०२४
वाळूज बरोबरच पारे गावातील कार्यकर्तेही पाटील गटात

राज्यात सध्या आचारसंहिता लागू झाली आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय नेत्यांनी हालचाली वाढवल्या आहेत. इच्छुकांनी गाठी भेटी सुरु केल्या आहेत. त्यामुळे नेतेमंडळींची निवडणुकीची लगबग सुरू असल्याचे पाहायला मिळत आहे. अजून मतदार संघात उमेदवार जाहीर झाले नसले तरी तिकीट मिळवण्यासाठी अनेकांची धावपळ सुरु आहे. एकूणच विधानसभा निवडणुकीचे राजकीय वातावरण तापू लागले असताना खानापूर-आटपाडी मतदारसंघातील वाळूज आणि पारे येतील बाबर गटातील अनेक कार्यकर्त्यांनी आज पाटील गटात जाहीर प्रवेश केला.


खानापूर आटपाडी मतदार संघात युवा नेते वैभव पाटील हे पायाला भिंगरी बांधून मतदारसंघाच्या कानाकोपऱ्यात फिरत आहेत. त्यांच्या छोट्या मोठ्या सभांना मिळणारा प्रतिसाद पाहून विरोधी गटातील नेत्यांच्या पोटात गोळा येत आहे. वैभव पाटील यांच्या कामाचा धडाका आणि सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची पद्धत. पाहून अनेक जण त्यांच्यासोबत येत आहेत. येणाऱ्या काळात मतदारसंघातील प्रश्न वैभव पाटीलच सोडवू शकतात, वैभव पाटील नावाचे वादळ मतदार संघात परिवर्तन करणार आहे. अशा प्रतिक्रिया मतदारसंघातून उमटत आहेत.


शिवसेनेचा बालेकिल्ला असणाऱ्या पारेगावात आज श्री दर्गोबा आणि श्री भिरोबा यात्रे निमित्त वैभव पाटील गेले असता त्यांना विरोधी गटातील असंख्य कार्यकर्त्यांनी गराडा घातला. त्यांचे आतषबाजी आणि घोषणा देऊन जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी पाटील गटात असंख्य कार्यकर्त्यांनी हजेरी लावली. शिवसेनेचा बालेकिल्ला असणाऱ्या पारेगावात विरोधी गटाला खंडार पडल्याचे दिसून आले. तसेच, वाळूज मधील साळुंखे वस्तीवरील बाबर गटातील ग्रामपंचायत सदस्य अनेक कार्यकर्ते यांनी आज पाटील गटात जाहीर प्रवेश केला. यावेळी विश्वास साळुंखे, ग्रामपंचायत सदस्य मधुकर शेठ साळुंखे, राम साळुंखे, बालाजी बाबर, महादेव गुजले, विकास गुजले, गणेश साळुंखे, नरेश साळुंखे उत्तम साळुंखे, विकास चव्हाण, दिलीप साळुंखे, सतपाल गुजले, आकाश साळुंखे, हनुमंत गुजले, अक्षय गुजले, सागर साळुंखे, सुनील पाटील यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.