Vihann News
728x90 Ad Slot

संतापजनक... स्कुल बस ड्रायव्हरकडून पुण्यात आठ वर्षांच्या दोन चिमुरड्या मुलींवर लैंगिक अत्याचार

ऑक्टोबर ०३, २०२४

पुण्यात पुन्हा दोनअल्पवयीन मुलींवर स्कुल बस ड्रायव्हरकडून लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे.

पुणे : गेल्या काही दिवसांपासून अल्पवयीन मुली आणि महिलांवरील अत्याचारात मोठी वाढ झाली आहे. बदलापूर, अकोला, पुण्यासह राज्यातील अनेक मोठ्या शहरांमध्ये अल्पवयीन मुलींसोबत घडलेल्या घटनांमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली. अशाच प्रकारे पुण्यात दोन अल्पवयीन मुलींचा लैंगिक छळ झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, पुण्यातील वानवडी परिसरात शाळेच्या बस चालकाने दोन आठ वर्षांच्या मुलींचा लैंगिक छळ केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी वानवडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून 45 वर्षीय स्कूल बस चालकाला अटक करण्यात आली आहे. ३० सप्टेंबर रोजी हा स्कूल बस चालक विद्यार्थिनींना घेऊन शाळेत पोहोचला होता. मुलींना शाळेतून घरी सोडत असताना त्याने आठ वर्षांच्या पीडित मुलींना ड्रायव्हरच्या कॅबमध्ये बोलावून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केला. पीडित मुलीने या प्रकरणाची माहिती तिच्या पालकांना दिल्यानंतर चालकाला अटक करण्यात आली. पीडित मुलींची प्रकृती स्थिर आहे. नियमानुसार प्रत्येक स्कूल बसमध्ये महिला काळजी केंद्र असणे बंधनकारक आहे. यावेळी या स्कूल बसची महिला केअरटेकर स्कूल बसमध्ये होती का, असा प्रश्न उपस्थित होत आहे. बदलापूर येथील घटनेनंतर पालक व नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.