Vihann News
728x90 Ad Slot

अंकलखोप ते कडेगाव निघणार संविधान सन्मान यात्रा

ऑक्टोबर ०६, २०२४
संविधान फाऊंडेशनचे अध्यक्ष चेतन सावंत यांनी दिली माहीती.

संविधानाच्या अमृत महोत्सव वर्षाचे औचित्य साधून अंकलखोप ते कडेगाव अशी संविधान सन्मान यात्रा निघणार आहे.७ ऑक्टोंबर रोजी सकाळी ८ वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर स्मारक, अंकलखोप येथून सुरु होणाऱ्या या यात्रेचा समारोप दुसऱ्या दिवशी सायंकाळी ६ वाजता कडेगाव मधील डॉ .बाबासाहेब आंबेडकर चौकात होणार आहे.कडेगाव मध्ये येताना कडेपुर ते कडेगाव अशी मोटरसायकल रॅली देखील निघणार आहे.
 संविधानाचा जागर व जनजागृती करणे हा या यात्रेचा प्रमुख उद्देश असून गावातील मध्यवर्ती ठिकाणी व ग्रामपंचायतीसमोर संविधान रथाचे स्वागत होणार आहे.हा कार्यक्रम संविधान फाऊंडेशनच्या वतीने होत असून सर्व संविधानप्रेमी लोकांनी या संविधान सन्मान यात्रेत सहभागी व्हावे अस आव्हान फाऊंडेशनचे अध्यक्ष चेतन सावंत यांनी केले आहे.