Vihann News

विशाल तारळेकर याचा राज्यस्तरीय व्यसनमुक्ती व मधुमेह मुक्ती दूत पुरस्काराने सन्मान

ऑक्टोबर ०९, २०२४



विटा :  समर्थ सोशल फाउंडेशन व न्युट्रीफील हेल्थ प्रो प्रा लि आणि शिव शंभू निवासी व्यसनमुक्ती केंद्र, कोल्हापूर यांच्या अंतर्गत दिनांक 29/09/2024 रोजी कोल्हापूर येथे राज्यस्तरीय व्यसनमुक्ती व मधुमेह मुक्ती दूत पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या पुरस्कार सोहळ्या दरम्यान संपूर्ण देशातून अनेक व्यसनमुक्त व मधुमेह मुक्त झालेले लोक उपस्थित होते त्याचबरोबर त्यांना व्यसनमुक्त व मधुमेह मुक्त करणारे व्यसनमुक्ती दूत हि त्या ठिकाणी उपस्थित होते. 

हा सोहळा संस्थेचे संस्थापक आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष सादिक शेख तसेच संस्थेचे संचालक आणि शिवशंभू निवासी व्यसनमुक्ती केंद्राचे संस्थापक सागर देसाई तसेच संस्थेचे संचालक अस्लम शेख आणि सुहास पाटील या मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. या सोहळ्यामध्ये तब्बल 160 लोकांना राज्यस्तरीय व्यसनमुक्ती व माधुमेह मुक्ती दूत या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या मध्ये संस्थेचा PRO कु. विशाल प्रविण तारळेकर याने समर्थ सोशल फाउंडेशन या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून अनेक लोकांना व्यसनमुक्त व मधुमेह मुक्त होण्यासाठी मदत केली, त्याच्या या कार्याची दखल घेऊन संस्थेच्या वतीने त्याचा राज्यस्तरीय व्यसनमुक्ती व मधुमेह मुक्ती दूत या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.