नेव्हिगेशन मेनू

अमोल शिंदे यांच्या वरदविनायक च्या आरोग्य शिबिरास उस्फुर्त प्रतिसाद

sbmarathi By sbmarathi
| ऑक्टोबर ०८, २०२४
भाळवणी :  मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांच्या प्रेरणेतून आणि आरोग्यदूत मंगेश चिवटे सर यांच्या संकल्पनेतून प्रेरणा घेऊन आणि आदरणीय सुहास अनिलभाऊ बाबर यांच्या मार्गदर्शनाखाली महाआरोग्य शिबिर संपन्न झाले. 
अनेक गरजू नागरिकांनी याचा लाभ घेतला. तसेच सर्व नागरिकांना मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी आणि महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेचा लाभ घेण्यासाठी मार्गदर्शन केले. 
तज्ञ व अनुभवी डॉक्टरांच्या मार्फत 
रक्तदाब तपासणी,रक्तातील साखरेची तपासणी, हृदयाची ई. सी. जी. तपासणी, आहार तज्ञांचे मार्गदर्शन, जनरल सर्दी-खोकला ताप-तपासणी करून औषधे व गोळ्या मोफत दिल्या. डोळ्यांची तपासणी, डोळ्यांचे मोतीबिंदू ऑपरेशन मोफत,डोळ्यांची औषधे मोफत दिली.
जवळपास 350 नागरिकांनी शिबिराचा लाभ घेतला आणि 9 पेशंटचे मोफत मोतीबिंदू ऑपरेशन करण्यासाठी सांगली येथील हॉस्पिटल मध्ये पाठवले.
या उपक्रमाचे आयोजन वरदविनायक सामाजिक संस्था आणि बी कंपनी. शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष यांनी केले होते.