Vihann News
728x90 Ad Slot

सुहास बाबर यांना विजयी करण्यासाठी आम्ही जीवाचं रान करू : मच्छिंद्र सकटे

ऑक्टोबर १९, २०२४

विटा : सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अमोल बाबर यांनी विटा येथे आयोजित पत्रकार परिषदेत दलित महासंघ महायुती सोबत असल्याचे सांगितले.

यावेळी दलित महासंघाचे संस्थापक प्रा. मच्छिंद्र सकटे बोलताना म्हणाले वंचित समूहाला न्याय देण्याचे काम या महायुतीच्या सरकारने केले आहे. गेली तीस वर्ष मातंग समाज आणि अनुसूचित जातीतल्या ५८ जाती अनुसूचित जाती प्रवर्गामध्ये अ ब क ड करा अशा पद्धतीची मागणी करत होत्या. तीस वर्ष आम्हीही लढाई लढतोय परंतु हा प्रश्न सुटत नव्हता. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट आणि रिसर्च सेंटर धरतीवर मातंग समाजाला स्वतंत्र आर टी द्या, आर टी ची स्थापना करा अशी मागणी आमची होती परंतु महाविकास आघाडी कडून फारसा प्रतिसाद मिळत नव्हता. महायुतीने दलितांच्या मागण्या पूर्णपणे सोडल्या आहेत. त्यामुळे आमच्या गरीब समाजाच्या दृष्टीने, दलित समाजाच्या दृष्टीने एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले पाहिजेत हे अतिशय महत्त्वाचे ठरणार आहे. 

महाराष्ट्रामध्ये महायुतीचे सरकार पुन्हा आलं पाहिजे अशा पद्धतीचा निर्धार करून आम्ही महायुतीला सपोर्ट करणार आहोत. त्याचाच एक भाग म्हणून खानापूर आटपाडी विधानसभा मतदारसंघात महायुतीचा जो कोणी उमेदवार असेल त्याला विजयी करण्यासाठी आम्ही जीवाचं रान करू.