Vihann News
728x90 Ad Slot

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर विट्यात जवानांकडून सशस्त्र पथ संचलन

ऑक्टोबर २५, २०२४

विटा (उदय दिक्षित) : आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुक २०२४ च्या पार्श्वभुमीवर विटे शहरात पोलिस व सीमा सुरक्षा दलाने विविध भागात सशस्त्र पथ संचलन केले आहे.

उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील, पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांनी त्यांच्या पोलीस अधिकारी, अंमलदार तसेच सीमा सुरक्षा दलाचे अधिकारी व जवान यांनी सशस्त्रासह विटा पोलीस स्टेशन पासुन विटा शहरामधील सांगली रस्ता, उभिपेठ, गांधी चौक, क्रांतिसिंह नाना पाटील पुतळा, यशवंत नगर, सावरकर नगर, विटा बस स्थानक असे पथ संचलन केले आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये होणारे प्रचार, मतदान, मतमोजणी इत्यादी या प्रक्रियेकरिता पोलीस प्रशासन सज्ज असुन कोणताही अनुचित प्रकार घडू नये याकरिता सदरचे पथ संचलन करण्यात आलेले आहे.