नेव्हिगेशन मेनू

Sangli Crime: अल्पवयीन मुलीला ब्लू फिल्म दाखवून तिच्यावर लैंगिक अत्याचार

sbmarathi By sbmarathi
| ऑक्टोबर ०९, २०२४
सांगली : राज्यात अत्याचाराच्या घटनांचीमालिका सुरूच आहे. त्यात सांगलीच्या संजय नगरमध्ये अल्पवयीन मुलीचा लैंगिक छळ झाल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान, यानंतर अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीच्या घराची जमावाने तोडफोड केली. तसेच, ज्या सार्वजनिक स्वच्छतागृहाचा गैरवापर होत होता, तेही संतप्त जमावाने फोडले. एका 28 वर्षीय तरुणाने 9 वर्षाच्या मुलीला ब्लू फिल्म दाखवून बलात्कार केला. यानंतर संजय नगर परिसरातील नागरिकांच्या संतापाचा उद्रेक झाला. सांगली येेेेथील संजयनगर पोलिसांनी आरोपी तरुणाला अटक करून आरोपीविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.