नेव्हिगेशन मेनू

वैभव पाटील यांच्या प्रचारार्थ खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची सोमवारी जाहीर सभा

sbmarathi By sbmarathi
| नोव्हेंबर १०, २०२४


राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची मुलुख मैदानी तोफ लोकप्रिय खासदार संसदरत्न, अमोल कोल्हे यांची खानापूर मतदार संघात वैभव सदाशिवराव पाटील यांच्या प्रचारार्थ जाहीर सभा होणार आहे. आपल्या अभिनयाच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांना घराघरात नेऊन पोहोचवणाऱ्या अमोल कोल्हे यांच्या सभेची खानापूर मतदार संघातील जनतेमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे.
सकाळी दहा वाजता विटे शहरातून कार्यकर्त्यांची भव्य बाईक रॅली निघणार आहे.
संसदेमध्ये आपल्या वक्तृत्व कौशल्याने डॉ. अमोल कोल्हे यांनी महाराष्ट्रातील विविध प्रश्नांना वाचा फोडली असून खासदार अमोल कोल्हे यांची ही सभा उद्या सोमवार दिनांक 11 नोव्हेंबर रोजी मायणी रोडवरील आदर्श महाविद्यालयाच्या पटांगणावरती दुपारी 12:15 वाजता होणार.
सभेला खानापूर मतदार संघातील नागरिकांना हजारोंच्या संख्येत उपस्थित राहण्याचे आव्हान करण्यात आले आहे.