Vihann News
728x90 Ad Slot

वैभव दादांच्या तुतारीसाठी चंद्रहार मैदानात

नोव्हेंबर १३, २०२४

जन्मगाव भाळवणीपासून केली प्रचाराची सुरुवात.

(महादेव धनवडे) : खानापूर विधानसभा मतदारसंघांमध्ये प्रचाराच्या रणधुमाळीने वेग घेतला असतानाच राजकारणामध्ये क्षणाक्षणाला बदल होत आहेत. आमदार गोपीचंद पडळकर यांनी काल घेतलेल्या मेळाव्यामधून राजकारणाचा रंगच बदलून टाकला. असे असतानाच आता शिवसेनेचे राज्य संघटक, डबल महाराष्ट्र केसरी पै चंद्रहार पाटील दादा हे आता खानापूर विधानसभेच्या रणांगणात उतरले असून वैभव दादांच्या तुतारीसाठी त्यांनी कंबर कसली आहे. आपल्या जन्मगावी भाळवणी ता.खानापूर येथे महाविकास आघाडीचे उमेदवार वैभव पाटील यांच्या प्रचारानिमित्त आयोजित केलेल्या प्रचाराचा शुभारंभ डबल महाराष्ट्र केसरी पैलवान चंद्रहार पाटील यांच्या हस्ते झाला. यावेळी संपूर्ण गावांमधून प्रचार फेरी काढण्यात आली. यावेळी झालेल्या कोपरासभेमध्ये महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार असणाऱ्या वैभव सदाशिवराव पाटील यांना प्रचंड बहुमताने निवडून आणण्याचे आवाहन डबल महाराष्ट्र केसरी पै.चंद्रहार पाटील दादा यांनी केले. यावेळी मा.पंचायत समिती सदस्य संजय मोहिते, केशव पाटील यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.