नेव्हिगेशन मेनू

वैभव दादांच्या दिमतीला पृथ्वीराज बाबांची यंत्रणा

sbmarathi By sbmarathi
| नोव्हेंबर ०२, २०२४

SB मराठी (महादेव धनवडे) : खानापूर मतदार संघ विधानसभेच्या निवडणुकीमध्ये रंग भरत आहे. प्रत्येक उमेदवार मतदारांच्या गाठीभेटी घेण्यावर भर देऊ लागले आहेत. माजी आमदार सदाशिवराव पाटील यांनी पुढाकार घेत तालुक्यातील गावागावात बैठका घेत आहेत. महा विकास आघाडीचे अधिकृत उमेदवार वैभव पाटील यांना निवडून आणायचे असाचंग त्यांनी बांधला आहे. त्यात वैभव पाटील यांचे बंधू विट्याचे माजी नगरसेवक पद्मसिंह भैया पाटील हे ही वैभव दादांच्या प्रचारात सक्रिय आहेत, आता दुसरे माजी नगरसेवक पृथ्वीराज बाबा पाटील हे सुद्धा महाविकास आघाडीचे उमेदवार वैभव दादा पाटील यांच्या प्रचारात उतरले आहेत. आजच त्यांनी आपल्या युवा कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन प्रचारात जोरदार मुसंडी घेणार असल्याचे जाहीर केले.


पद्मसिंह पाटील यांच्याबरोबरच पृथ्वीराज बाबा पाटील यांना मानणारा युवावर्ग विटा शहराबरोबरच खानापूर तालुक्यात सुद्धा मोठ्या प्रमाणावर आहे. युवकांच्यवर पृथ्वीराज बाबांची एक वेगळी क्रेझ आहे. वैभव दादा पाटील यांना या निवडणुकीत मोठ्या मताधिक्याने विजयी करून आपण जोरदारपणे दिवाळी साजरी करू असे त्यांनी यावेळी सांगितले.

यावेळी युवकांच्या मेळाव्यात बोलताना पृथ्वीराज बाबा म्हणाले की मी सुद्धा लहानपणापासूनच वैभव दादांच्या तालमीत तयार झालेला पठ्ठ्या असून, तन-मन-धनाने आपण वैभव दादांचं काम करायचं आहे. रात्रीचा दिवस करून आपण दादांना निवडून आणण्यासाठी आपण नेटाने प्रयत्न करायचे आहे. येणाऱ्या दोन-तीन दिवसात आपण अजून एक मोठा मेळावा घेऊ एकदा पृथ्वीराज बाबांनी कोणती गोष्ट मनावर घेतली तर त्याचा फडशा पडल्याशिवाय राहत नाही असे त्यांनी यावेळी सांगितले.