Vihann News
728x90 Ad Slot

परिवर्तन घडवूया.. वैभव दादांना साथ देऊया : विठ्ठलराव साळुंखे

नोव्हेंबर ०७, २०२४

SB मराठी (महादेव धनवडे) : खानापूर मतदार संघात तर परिवर्तन घडवायचे आहेच परंतु संपूर्ण राज्यात परिवर्तन घडवून महाविकास आघाडीला सत्तेत आणायचे आहे. त्यासाठी वैभव दादांना साथ देऊन जोरदार मताधिक्याने निवडून आणूया असे प्रतिपादन शिवप्रतापचे विठ्ठलराव साळुंखे यांनी केले.आपल्या गणातून विट्याच्या खालोखाल लिड द्यावे. वैभवदादांच्या जोडीला जयंतराव पाटील विश्वजित कदम, मोहनशेठ कदम, संजय विभुते चंद्रहार पाटील यांची ताकद व आपला आशीर्वाद या जोरावर वैभवदादा प्रचंड मतांनीविजयी होतील.

यावेळी बोलताना वैभव दादा पाटील म्हणाले की,मला कै. पतंगराव कदम, कै. यशवंतराव चव्हाण तसेच कै. हणमंतराव पाटील यांचे आशीर्वाद असून ते आशीर्वाद आपल्यासोबत आहेत मी परिवर्तनासाठी उमेदवारी करत आहे मला आपल्या परिसराचा चौफेर विकास करायचा आहे, असे प्रतिपादन खानापूर विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अॅड. वैभव पाटील यांनी केले.

ते बुधवारी प्रचारार्थ भाळवणी येथे आले होते. यावेळी त्यांनी युवा नेते विठ्ठल साळुंखे यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हा परिषद गटातून झंझावाती दौरा केला. कळंबी येथून मोठ्या जल्लोषात या दौऱ्याचा शुभारंभ गणेश मंदिरात व जोतिबा मंदिरात प्रचाराचा नारळ फोडून सुरुवात केली. यावेळी कंळबी गावातील भीमराव निकम, वसंत पाटील मारुती कदम, हरिभाऊ कदम भरत कदम संपत पाटील राजेंद्र पाटील प्रकाश कदम हणमंत कदम चैतन्य पाटील उत्कर्ष कदम यांच्यासह युवक ग्रामस्थ उपस्थित होते.

यावेळी बोलताना भीमराव म्हणाले, येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत वैभव पाटीलच आमदार होणार आहेत. आमच्या गावातून मताधिक्य देण्याची ग्वाही दिली.

यावेळी खानापूर पंचायत समिती सदस्य संजय मोहिते यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी वैभवदादा पाटील म्हणाले आपल्या महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांचे आशीर्वाद आपल्या सोबत आहेत विरोधकांच्याकडे टेंभू सोडला तर कोणताही ठोस मुद्दा नाही ज्या योजनेसाठी या परिसरातील प्रत्येक लोकप्रतिनिधींनी योगदान दिले मात्र हे सर्व काही आम्हीच केले अशी वल्गना करत आहेत. हे चुकीच आहे सदाशिवभाऊ आमदार असताना बाराशे कोटीचा निधी टेंभूसाठी मिळाल्यामुळेच ही योजना आज पूर्णत्वास जात आहे हे विरोधक विसरत आहेत तरी येणाऱ्या निवडणुकीत तुतारी वाजवणारा मनुष्य या चिन्हास मत देऊन मला भरघोस मताने विजयी करावे असे आवाहन केले.