Vihann News
728x90 Ad Slot

घाडगेवाडीकरांचा वैभव पाटील यांच्या पाठीशी ठाम असल्याचा निर्धार

नोव्हेंबर ०२, २०२४

SB मराठी (महादेव धनवडे) : घाडगेवाडी तालुका खानापूर येथील ग्रामस्थांची माजी आमदार एडवोकेट सदाशिवराव भाऊ पाटील यांच्या उपस्थितीत नुकतीच बैठक पार पडली या बैठकीमध्ये सर्व ग्रामस्थांनी आम्ही घाडगेवाडी गावातून महाआघाडी चे अधिकृत उमेदवार वैभव सदाशिवराव पाटील यांना नक्कीच मताधिक्य देऊ असा निर्धार करण्यात आला, स्वर्गीय माजी आमदार हणमंतराव पाटील यांचा वसा आणि वारसा आणि राष्ट्रीय नेते शरदचंद्रजी पवार यांचे दूरदृष्टीचे धोरण या पुढील काळात राबवण्यासाठी वैभव दादा पाटील यांची उमेदवारी जाहीर केली असून मतदारसंघाचा समतोल आणि सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू असे प्रतिपादन माजी आमदार एडवोकेट सदाशिव भाऊ पाटील यांनी केले.

यावेळी कार्यकर्त्यांनी चर्चा करतेवेळी सांगितले की विरोधकांनी पूर्णच्या पूर्ण गाव त्यांच्या पाठीमागे असणाऱ्या खोट्या बातम्या प्रसिद्ध केल्या होत्या त्यामध्ये काही तथ्य नसून आमचा पाठिंबा हा गावाच्या व मतदारसंघाच्या विकासाला आहे आणि हा विकास महाविकास आघाडी च्या माध्यमातून वैभव दादा पाटील करतील याचा आम्हाला विश्वास आहे म्हणूनच आम्ही सर्वजण एकमताने वैभव दादा पाटील यांच्या पाठीशी राहणार आहोत अशी माहिती येथील कार्यकर्ते मनोहर घाडगे यांनी दिली.

 यावेळी शशिकांत घाडगे, विश्वास घाडगे ,प्रताप घाडगे पोपट घाडगे ,दाजीराम घाडगे, भानुदास घाडगे ,योगेश घाडगे यशवंत घाडगे ,बाजीराव घाडगे सोन्या पवार इत्यादी कार्यकर्त्यांसह ग्रामस्थ उपस्थित होते.