Vihann News
728x90 Ad Slot

शेकडो कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात प्रवेश

नोव्हेंबर १५, २०२४

इस्लामपूर (प्रतिनिधी) : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, इस्लामपूर विधानसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आ.जयंतराव पाटील यांच्या नेतृत्वा वर विश्वास ठेवून वाळवा तालुक्यातील येडेमच्छिंद्र, तुजारपूर, मसूचीवाडी, साटपेवाडी तसेच मिरज तालुक्यातील दुधगाव येथील शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. "आमचा पक्ष, तालुका, मतदारसंघ हा एक परिवार आहे. आमच्या परिवारात तुमचे स्वागत करतो. 

आपण पक्षाच्या माध्यमातून गावाची, समाजाची सेवा करा. आपला पक्षात योग्य मान-सन्मान ठेवला जाईल, असा विश्वास आ. जयंतराव पाटील यांनी यावेळी व्यक्त केला.

येडेमच्छिंद्र येथील माजी उपसरपंच संभाजी मानकर, सामाजिक कार्यकर्ते मच्छिंद्र नाथ कांबळे, महेश कांबळे,मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते अल्लाउद्दीन नदाफ,उदय कदम, गणेश कांबळे, रमेश सावंत, तसेच कृष्णा पाणी पुरवठ्याचे संचालक राजेंद्र पाटील, यशवंत पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य आबासो चव्हाण, अक्षय पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला‌.

तुजारपूर येथील प्रविण बाबर, सचिन बाबर, अनिल निकम, श्रीकांत पाटील, धोंडीराम शेळके यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला. 

मसूचीवाडी येथील तंटामुक्तीचे अध्यक्ष मंगेश पवार यांनी आपल्या ५०-६० सहकाऱ्यां सह राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यामध्ये भिजीत माने, सुशांत पवार,अजित कदम, धोंडिराम कदम, विशाल कदम,प्रशांत माने, साहिल शेळके यांचा प्रामुख्याने समावेश आहे.

साटपेवाडीचे तंटामुक्तीचे अध्यक्ष सचिदा नंद साटपे यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांच्या पत्नी सौ.सुरेखा साटपे या साटपेवाडीच्या माजी सरपंच आहेत. तसेच दुधगाव येथील विरसेवा दलाचे निखिल आडमुठे, अमोल खोचीकार, मुकुंद गवळी, श्रेणिक पाटील यांनीही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष देवराज पाटील, तालुकाध्यक्ष विजयराव पाटील, नेर्ल्याचे सरपंच संजय पाटील,माजी जि.प. उपाध्यक्ष रणजित पाटील, क्रांतिसिंह नाना पाटील शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अजित पाटील, तुजारपूरचे संतोष पाटील, उध्दव पाटील, माणिक पाटील दुधगावचे माजी सरपंच विकास कदम, प्रमोद आवटी, मसूचीवाडी सर्जेराव कदम,उपसरपंच संजय कदम, साटपेवाडीचे जयवंत पाटील, अशोक जाधव,उपसरपंच अशोक साटपे प्रामुख्याने उपस्थित होते.