Vihann News
728x90 Ad Slot

विट्यात ड्रग्स तयार करणारी फॅक्टरी, जिल्ह्यात खळबळ

जानेवारी २८, २०२५

विटा परिसरात ड्रग्स तयार करणारी फॅक्टरी आढळून आल्याने सांगली जिल्हा हादरून गेला. कार्वे एमआयडीसीत ही एमडी ड्रग्स तयार करणारी फॅक्टरी आढवून आल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे. केमिकलच्या नावाखाली ड्रग्स तयार करणाऱ्या या ड्रग्स फॅक्टरीवर सांगलीच्या स्थानिक गुणे अन्वेशन विभागाने छापा टाकला. या छापेमारीत तब्बल 14 किलों तयार एम डी ड्रग्स आढळून आल्याची माहिती आहे. या छाप्यात एमडी ड्रग्स सह सुमारे 15 कोटींचा मुद्देमाल सांगली पोलिसांनी जप्त केल्याचे देखील सांगण्यात येत आहे.

विट्यातील आयटीआय कॉलेज जवळील एक सराईत गुन्हेगार या ड्रग्स प्रकरणात सामील असल्याची माहिती समोर येत आहे. विट्यातील या सराईत गुन्हेगाराचे ड्रग्स प्रकरणी मुंबई कनेक्शन असल्याचे देखील बोलले जात आहे. रात्रभर झालेल्या मोठ्या कारवाई नंतर या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तर या ड्रग्स फॅक्टरी वर छापा टाकून धडक कारवाई करणाèया पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांचेसह त्यांच्या टीमचे परिसरातून कौतुक होत आहे.

विटा परिसरात एमडी ड्रग्स तयार करणारी फॅक्टरीज आढळून आल्याने सांगली जिल्हा हदरून गेला आहे. याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, सोमवार 27 जानेवारी रोजी दुपारी विटा येथून मुंबईकडे ड्रग्स सप्लाय होत असल्याची माहिती सांगली पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस अधीक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक ग़ुन्हे अन्वेशन विभागाने विटा परिसरात सापळा लावला. यावेळी विट्यातून एक चार चाकी गाडी मुंबईच्या दिशेने ड्रग सप्लाय करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यावेळी विटा-नेवरी रस्त्यावर यंत्रणा लाऊन पोलिसांनी एका चार चाकी गाडीचा तपास केला यावेळी या गाडीत कोट्यावधी रुपयांचा तयार एमडी ड्रग्स पोलिसांना आढळून आला यानंतर पोलिसांनी सदर गाडीतील संशयितांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली असता विटा परिसरातील कार्वे एमआयडीसी येथे एमडी ड्रग्स तयार होत असल्याचे समोर आले. यानंतर कार्वे एमआयडीसी परिसरात स्थानिक गुणे अन्वेशन विभागाने छापेमारी केली यावेळी सुमारे एक महिन्यापूर्वी माऊली इंडस्ट्रीज या नावाने केमिकल बनवणाèया फॅक्टरीच्या नावाखाली ड्रग्सचा मोठा धंदा सुरू असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. यावेळी पोलिसांनी केलेल्या मोठ्या छापेमारीत तब्बल 14 किलो तयार एमडी ड्रग्स आढळून आल्याचे देखील सांगण्यात येत आहे. तर या छाप्यात एमडी ड्रग्स सह सुमारे 15 कोटींचा मुद्देमाल सांगली पोलिसांनी जप्त देखील केल्याची माहिती समोर येत आहे. या मोठ्या छापेमारी नंतर स्थानिक पुणे अन्वेशन विभागाने कार्वे एमआयडीसी मधील माऊली इंडस्ट्रीज या ठिकाणी रात्रभर पंचनामा केला आहे. तर माऊली इंडस्ट्रीज या केमिकल फॅक्टरीच्या नावाखाली तयार होणाèया ड्रग्सचे मुंबई कनेक्शन असून या संपूर्ण रॅकेट मध्ये विट्यातील आयटीआय कॉलेज जवळील एक सराईत गुन्हेगार आणि मुंबई येथील काही जण सामील असल्याचे देखील बोलले जात आहे. या संपूर्ण प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून लवकरच याबाबत अधिक माहिती निष्पन्न होणार आहे.