Vihann News
728x90 Ad Slot

निसर्ग फाउंडेशन संस्थेची नूतन कार्यकारणी जाहीर

फेब्रुवारी २४, २०२५
संस्थेचे कार्यवाह सांगली जिल्हा शैल्य चिकित्सक डॉ.विक्रमसिंह कदम यांची अधिकृत घोषणा : आमदार सुहासभैय्या बाबर यांच्या हस्ते नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार

विटा : सांगली जिल्ह्यातील निसर्ग फाउंडेशन लेंगरे या नोंदणीकृत सामाजिक संस्थेचे कार्यवाह सांगली जिल्हा शैल्य चिकित्सक डॉ.विक्रमसिंह कदम साहेब यांनी संस्थेच्या सर्वसाधारण सभेत नूतन कार्यकारणी जाहीर केली या कार्यकारणीत सल्लागार पदी मा. श्री सुनिलदादा शिंदे-पाटील, जेष्ठ अर्थतज्ञ प्रा. संजय ठिगळे सर, सहकार्यवाह पदी मा. श्री. फिरोजभैय्या शेख, सरचिटणीस पदी श्री. निवासदादा कदम, समन्वयक पदी डॉ. शिवाजी गुजर, कार्याध्यक्ष पदी श्री. नवनाथ सगरे सर यांची निवड करण्यात आली. सर्व नूतन पदाधिकारी यांना खानापूर -आटपाडी विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. श्री. सुहासभैय्या बाबर यांच्या हस्ते निवडपत्र देऊन सत्कार करण्यात आला. 
याप्रसंगी बोलताना आमदार सुहासभैय्या बाबर म्हणाले की सामाजिक क्षेत्रात सातत्याने सक्रिय असलेली निसर्ग फाउंडेशन संस्था ही तालुक्यातील सर्व सामान्यांच्या हितासाठी काम करत आहे. संस्थेने ग्रामीणभागात स्व. आमदार अनिलभाऊ बाबर यांच्या स्मरणार्थ रुग्णावाहीका सुरु केली आहे. पर्यावरण व स्वच्छ भारत अभियानात संस्थेचे कार्य उल्लेखनीय आहे. आज या संस्थेच्या नूतन पदाधिकारी निवडीमध्ये सामाजिक कामात नेहमी सक्रिय असलेल्या पदाधिकाऱ्यांची निवड केली आहे. ही सर्व मंडळी संस्थेला प्रगतीपथावर पोहचवतील आणि यांच्या माध्यमातून अभिनव उपक्रम व लोकहितार्थ कार्य घडेल असा मला विश्वास आहे. मी एक लोकप्रतिनिधी म्हणून कायम निसर्ग फाउंडेशन च्या मागे भक्कमपणे उभा आहे. असे प्रतिपादन यावेळी केले.
यावेळी निसर्ग फाउंडेशनचे सचिव नानासाहेब मंडलिक, उपाध्यक्षा डॉ. वैशाली हजारे, अध्यक्ष नितीन चंदनशिवे, युवानेते प्रकाश बागल, संस्थेचे खजिनदार भगवान जाधव, प्रकल्प संचालक प्रमोद भोसले, सदस्य सुरज मंडले, पुजा चंदनशिवे, जीवन धेंडे, अभि गायगवळे, प्रतिक्षा जाधव, यांचेसह अन्य पदाधिकारी उपस्थित होते.