Vihann News
728x90 Ad Slot

खानापूर तालुका मराठी पत्रकार संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी गणेश धेंडे यांची निवड

मे ०४, २०२५



खानापूर तालुका मराठी पत्रकार संघटनेची नूतन कार्यकारिणी जाहीर



विटा (एस बी मराठी) : खानापूर तालुका ग्रामीण मराठी पत्रकार संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी दै. बंधुताचे खानापूर तालुका प्रतिनिधी गणेश धेंडे यांची तर तालुका उपाध्यक्षपदी दै. सकाळचे पारे प्रतिनिधी संजय सागर व दै. केसरीचे खानापूर प्रतिनिधी संजय डोंगरे यांची सर्वानुमते बिनविरोध निवड करण्यात आली. गजानन बाबर (जनमत, विटा), सदाशिव डोंगरे (पुण्यनगरी, खानापूर) या दोघांची जिल्हा कार्यकारिणी सदस्यपदी निवड करण्यात आली. याबाबत निवडीचे अधिकृत पत्र पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रताप मेटकरी आणि जेष्ठ मार्गदर्शक दिलीपराव मोहिते यांच्या हस्ते प्रदान करून नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांचा सत्कार करण्यात आला.
खानापूर तालुका ग्रामीण मराठी पत्रकार संघटनेच्या पदाधिकारी निवडीसाठी शासकीय विश्रामगृहात पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष प्रताप मेटकरी यांच्या अध्यक्षतेखाली मार्गदर्शक दिलीपराव मोहिते आणि मावळते तालुकाध्यक्ष पांडुरंग डोंगरे यांच्या प्रमुख उपस्थितीत खानापूर तालुक्यातील सर्व पत्रकारांची विशेष बैठक झाली. या बैठकीत नूतन पदाधिकार्‍यांच्या सर्वानुमते निवडी करण्यात आल्या.
या बैठकीत सर्वानुमते निवडलेले खानापूर तालुका ग्रामीण मराठी पत्रकार संघटनेचे नूतन पदाधिकारी असे : तालुकाध्यक्ष - गणेश धेंडे (बंधुता), तालुका उपाध्यक्ष - संजय सागर, (सकाळ, पारे), संजय डोंगरे (केसरी, खानापूर), सचिव - लक्ष्मण पाटील (सेव्हन स्टार न्यूज चॅनेल, विटा), खजिनदार - महेश फासे (वाळवा क्रांती, विटा), संघटक - अनिलदत्त डोंगरे (सकाळ, खानापूर), पोपट रास्ते (पुण्यनगरी, भिवघाट), प्रसिद्धी विभागप्रमुख - महादेव धनवडे (साप्ताहिक भाळवणी एक्स्प्रेस), सोशल मीडियाप्रमुख - राम शिंदे (प्रेसफोटोग्राफर)
तालुका कार्यकारिणी सदस्य - चंद्रकांत जाधव (पुण्यनगरी, आळसंद), दत्तात्रय डोंगरे, (जनमत, खानापूर), सिराज शिकलगार (प्रीतिसंगम, विटा), विनायक देशपांडे (पब्लिक अँप, विटा), रविकुमार मगदूम (साप्ताहिक आवाज), सागर कदम (विटा लाईव्ह न्यूज चॅनेल), विजय सूर्यवंशी (स्मार्ट शेतकरी चॅनेल), राजेश जाधव (ललकार, विटा), तुषार टिंगरे (तरूणभारत, खानापूर), संदीप माने (लोकमत, खानापूर), सचिन निकम (सकाळ, लेंगरे), प्रमोद रावळ (लोकमत, आळसंद), दीपक पवार (सकाळ, आळसंद), प्रमोद तारळेकर (जनप्रवास, विटा), प्रमोद भोसले (ललकार, ढवळेश्वर), सोहम भंडारे (एनव्हीबी न्यूज चॅनेल), प्रवीण जावीर, पवन कांबळे (विटा लाईव्ह न्यूज चॅनेल), अमोल सावंत, सुरेश सरगर, मुरली आमणे, राजू खिलारे, रोहन टेके, संजय फासे, सत्यजित सकट (प्रेस फोटोग्राफर).
यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष प्रताप मेटकरी म्हणाले, राज्य संघटक संजय भोकरेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघटना राज्यातील पत्रकारांसाठी काम करत आहे. पत्रकार संघटनेच्या माध्यमातून पत्रकारांचे प्रश्न व अडचणी सोडविण्यासाठी नूतन पदाधिकार्‍यांनी काम करावे. भोकरेसाहेबांच्या संकल्पनेतून विटा नगरपालिकेने दिलेल्या 10 गुंठे जागेत राज्यातील रोलमॉडेल आणि सुसज्ज असे पत्रकार भवन विट्यात लवकरच उभारले जाणार आहे. पत्रकार भवन उभारणीसाठी खानापूर तालुक्यातील सर्व पत्रकारांनी एकसंघपणे काम करूया, असे आवाहन केले.
नवनिर्वाचित तालुकाध्यक्ष गणेश धेंडे म्हणाले, राज्य संघटक संजय भोकरेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली पत्रकार संघटनेच्या माध्यमातून खानापूर तालुक्यातील पत्रकारांचे प्रश्न व अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहीन. तालुकाध्यक्षपदाची मिळालेली जबाबदारी सर्व सहकारी पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन सक्षमपणे पार पाडून खानापूर तालुक्यात पत्रकार संघाचे काम अधिक प्रभावीपणे केले जाईल.
स्वागत व प्रास्ताविक दिलीपराव मोहिते यांनी केले. आभार पांडुरंग डोंगरे यांनी मानले.