Vihann News
728x90 Ad Slot

भाळवणीत सरसेनापती संताजी घोरपडे यांचे भव्य दिव्य स्मारक उभारणार : आमदार गोपीचंद पडळकर

जून ०७, २०२५

 


भाळवणी (महादेव धनवडे) :  छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराचे सरसेनापती असणारे संताजी घोरपडे यांचे भव्य दिव्य असे स्मारक त्यांचे जन्मगाव असलेल्या खानापूर तालुक्यातील भाळवणी येथे उभारणार असल्याचे प्रतिपादन आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले. भाळवणी येथे संताजी घोरपडे यांच्या जन्मस्थळी भेट देऊन त्यांनी अभिवादन केले. यावेळी सरसेनापती संताजी म्हाळोजी घोरपडे प्रतिष्ठानचे अध्यक्ष, मानसिंगराव घोरपडे उपस्थित होते.

 यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की खानापूर तालुक्यात भाळवणी,बानूरगड अशी ऐतिहासिक वारसा लाभलेली स्थळे आहेत. आम्ही नेहमीच या ऐतिहासिक वारसा स्थळाचे पुनरुज्जीवन करण्यासाठी पुढाकार घेत असतो. संताजी घोरपडे प्रतिष्ठानचे अध्यक्ष मानसिंगराव घोरपडे यांच्याकडून तसेच भाळवणीतील ग्रामस्थांच्याकडून ऐतिहासिक माहिती जाणून घेतली. संताजी घोरपडे यांनी मोगलाविरुद्ध दिलेला लढा हा अतिशय पराक्रमी होता आणि त्याचे इतिहासात अतिशय मोलाचे योगदान आहे.

त्यामुळे संताजी घोरपडे यांचे त्यांच्या ऐतिहासिक पराक्रमाला साजेल असे भव्य दिव्य स्मारक उभारण्याचा त्यांनी निश्चय केला. व या समाधी स्थळाचा विकास आराखडा तयार करण्याबाबत सर्व संबंधित अधिकाऱ्यांना सुचित केले.

यावेळी सरसेनापती संताजी घोरपडे प्रतिष्ठानचे अध्यक्ष मानसिंग घोरपडे,विद्याधर घोरपडे,कुलदीप घोरपडे,आदेश घोरपडे, योगिराज घोरपडे, हर्षवर्धन घोरपडे, अक्षय घोरपडे, रमेश घोरपडे तसेच सर्व मान्यवर उपस्थित होते.