Vihann News
728x90 Ad Slot

वरदविनायक संस्थेकडून भाळवणीत विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप

जून २५, २०२५
भाळवणी : वरदविनायक सामाजिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष अमोल आनंदराव शिंदे यांच्या पुढाकाराने भाळवणी परिसरातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना वह्यांचे वाटप करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळाले.
यावेळी जिल्हा परिषद शाळा भाळवणी, जिल्हा परिषद उर्दू शाळा भाळवणी, जिल्हा परिषद शाळा शिंदे चव्हाण मळा, जिल्हा परिषद शाळा निकम घोल मळा आणि जिल्हा परिषद शाळा मुल्लानगर, भाळवणी येथील पहिली ते सातवीमधील विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना वह्या वाटण्यात आल्या.
याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, शाळेचे मुख्याध्यापक व सर्व शिक्षक, भाळवणी गावचे लोकनियुक्त सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तसेच वरदविनायक सामाजिक संस्थेचे स्वयंसेवक उपस्थित होते. उपस्थितांनी वह्या वाटप करून विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
वरदविनायक सामाजिक संस्थेचा हा उपक्रम समाजातील वंचित घटकांना शिक्षणासाठी मदत करण्याच्या त्यांच्या ध्येयाचा एक भाग आहे. यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाला हातभार लागत असून, त्यांना आवश्यक शैक्षणिक साहित्य उपलब्ध होत आहे.