Vihann News
728x90 Ad Slot

वैभव पाटील यांच्या हस्ते कमळापूर सोसायटीच्या नूतन संचालकांचा सत्कार

जून १७, २०२५

विटा : कमळापूर सर्वसेवा सहकारी सोसायटी लिमिटेड कमळापूरच्या संचालक मंडळ पंचवार्षिक निवडणुकीमध्ये श्री चौंडेश्वरी स्वाभिमानी शेतकरी परिवर्तन पॅनेलने एक हाती सत्ता मिळाली. 

नूतन संचालक पदी निवडून आलेल्या विजयी उमेदवारांचा माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी सत्कार केला. त्यावेळी नूतन संचालिका सौ. राजाक्का नामदेव गायकवाड, श्रीमती. वारणा दशरथ रेपे व संचालक प्रमोद धोंडीराम साळुंखे, अजित अशोक साळुंखे, सुभाष शहाजी साळुंखे, शंकर भिमराव साळुंखे, राहुल संजय मोहिते, अतुल भिमराव गायकवाड, सचिन आत्माराम नलवडे, अवधूत भगवान गायकवाड, हणमंत गणपती शिरतोडे, अंकुश दादू गोतपागर तसेच दशरथ आण्णा साळुंखे, अरविंद बापू गायकवाड, जयवंत शेठ साळुंखे, भिमराव दादा गायकवाड, हणमंत नाना नलवडे, प्रसाद साळुंखे, शांताराम साळुंखे, विशाल गायकवाड गणेश जाधव, किशोर साळुंखे, निखिल गायकवाड, सुरेंद्र पाटील, प्रशांत गायकवाड, अशोक साळुंखे, उमाजी शिरतोडे उपस्थित होते.