नेव्हिगेशन मेनू

पंकज दबडे अजित दादांच्या गटात

sbmarathi By sbmarathi
| जून २४, २०२५

विटा : आमदार गोपीचंद पडळकर यांचे निकटवर्तीय पंकज दबडे यांनी भाजपच्या सर्व पदांचा तडका धडकी राजीनामा दिल्याने मतदारसंघात खळबळ उडाली होती. पंकज दबडे नेमकी कोणती भूमिका घेणार याकडे मतदार संघाचे लक्ष लागलेले असतानाच पंकज दबडे यांनी राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केला. 
त्यांच्याबरोबर संदीप ठोंबरे यांनीही प्रवेश केला. राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांचा सत्कार केला व तात्काळ पंकज दबडे यांना राष्ट्रवादी तालुकाध्यक्षपदी निवड केली.
संदीप ठोंबरे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभाग सांगली जिल्हा अध्यक्षपदी निवड केली. पंकज दबडे व त्यांच्या सहकार्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश करून सर्वांना धक्का दिला आहे. या प्रवेशाची व निवडीची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे.