विटा: शुक्रवार, ४ जुलै २०१७ रोजी लायन्स क्लब ऑफ विटा गोल्डच्या नूतन सदस्यांचा आणि पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण व शपथविधी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या सोहळ्यात २०२५-२६ या वर्षासाठीच्या नवीन कार्यकारिणीने आपल्या पदाची सूत्रे हाती घेतली.
या कार्यक्रमासाठी एमजेएफ लायन मंगेश भाई दोशी, एमजेएफ लायन सुहास निकम, लायन डॉ. आलोक नरदे, रिजन चेअरमन लायन अली अकबर बिरजादे आणि झोन चेअरमन लायन संजय मालानी हे प्रमुख मान्यवर उपस्थित होते. या सर्व मान्यवरांनी नवीन सदस्यांना आणि पदाधिकाऱ्यांना शपथ दिली, तसेच लायन्स क्लब आणि त्याच्या कार्याबद्दल सखोल माहिती दिली.
लायन्स क्लब ऑफ विटा गोल्डचे संस्थापक अध्यक्ष लायन किरण कलढोणे यांनी आपल्या कार्यकाळातील आणि राबवलेल्या उपक्रमांची माहिती दिली. मावळते अध्यक्ष लायन रोहित पवार यांनीही मागील वर्षात राबवलेल्या उपक्रमांचा आणि कार्यक्रमांचा आढावा प्रमुख पाहुण्यांसमोर आणि उपस्थितांसमोर मांडला.
त्यानंतर २०२५-२६ या नवीन वर्षासाठीच्या नवीन पदाधिकाऱ्यांचा शपथविधी आणि पदग्रहण सोहळा पार पडला. यामध्ये, लायन संजय पवार यांची अध्यक्षपदी, लायन रामदास देवकर यांची उपाध्यक्षपदी, लायन प्रसाद कलढोणे यांची सचिवपदी तर लायन मनोज वाघमोडे यांची खजिनदारपदी निवड करण्यात आली. लायन्सचे नूतन अध्यक्ष लायन संजय पवार यांनी या वर्षातील आपली कार्ये आणि उद्दिष्ट्ये यांची रूपरेषा उपस्थितांसमोर मांडली.
प्रमुख उपस्थित लायन अली अकबर बिरजादे यांनी नूतन पदाधिकाऱ्यांना शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमाला लायन किरण कलढोणे, लायन रोहित पवार, लायन डॉ. दत्तात्रय भगत, लायन ज्योती साळुंखे, लायन विकास निकम, लायन डॉ. गिरीश शरणाथे, लायन डॉ. भरत देवकर, लायन डॉ. अमोल तारळेकर, लायन डॉ. अक्षय बापट, लायन महेश शानबाग, लायन सौ. मंजिरी गुळवणी, लायन अबिद शेख, लायन लक्ष्मण कदम, लायन शरद नलवडे तसेच इतर नूतन सदस्य व त्यांचे कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी लायन रोहित पवार यांनी उपस्थितांचे आभार मानले.

0 टिप्पण्या