आपल्या निवडीनंतर सत्यजीत पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुनील तटकरे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा, प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण आणि जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांचे मनःपूर्वक आभार मानले.
यावेळी बोलताना सत्यजीत पाटील यांनी पक्षाने दाखवलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. ते म्हणाले, "राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने माझ्यावर विश्वास ठेवून जी संधी दिली आहे, त्या संधीचं मी नक्कीच सोनं करेन. भविष्यात मी शिव, शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारांवर काम करेन आणि सर्वसामान्य, गोरगरीब, शेतकरी तसेच युवकांच्या प्रश्नांवर काम करण्यासाठी कटिबद्ध राहीन."
सत्यजीत पाटील यांच्या निवडीमुळे राष्ट्रवादी युवक काँग्रेसला युवा आणि तळागाळातील कार्यकर्त्यांचे प्रतिनिधित्व मिळेल अशी आशा व्यक्त केली जात आहे.

0 टिप्पण्या