Vihann News
728x90 Ad Slot

देविदास विभुते यांना मातृशोक; सावित्री धोंडीराम विभुते यांचे निधन

जुलै ०८, २०२५

सावित्री धोंडीराम विभुते यांचे निधन
सोनी, (प्रतिनिधी) : कै. शिवदास विभुते, सोनी विविध कार्यकारी विकास सोसायटीचे सदस्य देविदास विभुते, ह.भ.प. दिलीप विभुते, यांच्या मातोश्री सावित्री धोंडीराम विभुते यांचे मंगळवार, ८ जुलै रोजी सकाळी ७ वाजता अल्पशा आजाराने निधन झाले. त्या १०० वर्षांच्या होत्या.
सावित्रीबाईंनी नुकताच, म्हणजे ६ जून रोजी आपला १०० वा वाढदिवस कुटुंबासोबत मोठ्या उत्साहात साजरा केला होता. त्यांच्या निधनाने विभुते कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

लिंगायत समाजाच्या रीतीरिवाजानुसार त्यांच्यावर दफन करून अंत्यसंस्कार करण्यात आले. दशक्रिया विधी दुपारी २ वाजता पार पडला. सावित्री धोंडीराम विभुते यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी, सुना आणि नातवंडे असा मोठा परिवार आहे.

विभूते कुटुंबीयांचे सांत्वन करण्यासाठी सोनी विविध कार्यकारी विकास सोसायटीचे सर्व सदस्य, सोनी गावचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य तसेच परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.