Vihann News
728x90 Ad Slot

शिवप्रताप मल्टीस्टेटची २३ वी वार्षिक सभा उत्साहात संपन्न: आर्थिक प्रगती आणि तांत्रिक आधुनिकतेवर भर

जुलै ११, २०२५

विटा : येथील शिवप्रताप मल्टीस्टेट नागरी को. ऑप. क्रेडिट सोसायटीची २३ वी वार्षिक सर्वसाधारण सभा शुक्रवार, ११ जुलै २०२५ रोजी विटा येथे मोठ्या उत्साहात पार पडली. या सभेला हजारो सभासदांनी उपस्थिती दर्शवली.
सभेची सुरुवात संस्थेचे संस्थापक, कै. प्रतापशेठ (दादा) साळुंखे यांच्या स्मृतींना अभिवादन करून झाली. कार्यकारी संचालक, मा. विठ्ठलराव साळुंखे यांनी संस्थेच्या २०२४-२५ या आर्थिक वर्षाचा आढावा सादर करत, भरीव आर्थिक यश मिळाल्याचे सांगितले आणि सभासदांसाठी आकर्षक लाभांश जाहीर केला.
चेअरमन मा. शेखर साळुंखे यांनी संस्थेने मोबाईल बँकिंग, क्यूआर कोड व्यवहार यांसारख्या डिजिटल सेवा ग्रामीण भागातही प्रभावीपणे पोहोचवल्याचे नमूद केले. तसेच, भविष्यात नवीन योजना आणि शाखा विस्तारावर लक्ष केंद्रित करणार असल्याचे सांगितले. सभासदांनी संस्थेच्या कामकाजावर समाधान व्यक्त करत काही महत्त्वाच्या सूचनाही दिल्या.
सभेच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे कर्मचारी आणि व्यवस्थापनाचे कौतुक करण्यात आले. सूत्रसंचालन तेजस्वी पाटील यांनी उत्साही व ओघवत्या शैलीत पार पाडले. सभेच्या प्रारंभी श्री. गणेश बाबर यांनी सर्व मान्यवरांचे आणि सभासदांचे मनःपूर्वक स्वागत केले. तर आभार संस्थेच्या संचालिका सौ. सुरेखा जाधव यांनी मानले