Vihann News
728x90 Ad Slot

सावळज गटात आमदारांचा बालेकिल्ला कोसळला; वायफळेत संजय काकांच्या वाघाने मैदान मारले

फेब्रुवारी ०९, २०२६

सुखदेव आबांनी विजय मिळवून इतिहास, विजयाचा गुलाल जेसीबी ने उधळला.!

वायफळे प्रतिनिधी : मागील सलग दोन-तीन निवडणुकांतील पराभवानंतरही खचून न जाता वायफळेचे सुपुत्र सुखदेव पाटील यांनी वायफळे पंचायत समिती गणातून पुन्हा एकदा निवडणूक लढवली. आमदार रोहित पाटील गटाचा उमेदवार जितेंद्र झांबरे यांना आस्मान दाखवत त्यांनी दणदणीत विजय मिळवला. आमदार रोहित पाटील यांचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या या गणात सुखदेव पाटील यांनी विजयश्री खेचून आणली व गेल्या दोन तीन वेळचे अपयश कार्यकर्त्यांनी जेसीबी च्या सा ह्याने  गुलाल उधळून  विज्योत्सव साजरा केला व लक्ष लागून राहिलेल्या या निवडणुकीच्या निकालाने जिल्ह्यात राजकीय खळबळ उडवली.

वायफळे पंचायत समिती गणाच्या निवडणुकीकडे अवघ्या जिल्ह्याचे लक्ष लागून राहिले होते. माजी खासदार संजय पाटील गटाकडून सुखदेव पाटील तर आमदार रोहित पाटील गटाकडून जितेंद्र झांबरे रिंगणात होते. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या लढतीत सुखदेव पाटील यांनी सुमारे सहाशे मतांच्या फरकाने विजय मिळवला.

सुखदेव पाटील हे दूरदृष्टी असलेले नेतृत्व म्हणून ओळखले जातात. यापूर्वी पंचायत समिती व सरपंच पदाच्या निवडणुकांमध्ये त्यांना अपयश आले होते. मात्र या अपयशातून धडा घेत, अधिक जोमाने त्यांनी यावेळी निवडणूक लढवली. पहिल्या दिवसापासून त्यांनी प्रचारात आघाडी घेतली होती. घराघरांत जाऊन मतदारांशी थेट संवाद साधत त्यांनी विश्वासाचे नाते निर्माण केले.

सावळज जिल्हा परिषद गट लागल्याचे स्पष्ट झाले आहे. हा आमदार रोहित पाटील यांचा बालेकिल्ला मानला जातो. मात्र याच गटातील वायफळे गणातून सुखदेव पाटील यांनी 'वादळात दिवा लावण्याचा' प्रयत्न केला आणि तो यशस्वी ठरवला. या विजयामुळे आम दार गटाच्या बालेकिल्ल्याला सुरुंग सुखदेव पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून वायफळे गणात मोठ्या प्रमाणावर विकासकामे केली आहेत. वायफळे हायस्कूलच्या भव्य इमारतीसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उभारणे, मंडल अधिकारी कार्यालय, वीज उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, वायफळे यमगरवाडी रस्त्यावरील सुमारे साडेसात कोटींचा पूल आदी अनेक महत्त्वाची कामे त्यांच्या प्रयत्नातून मार्गी लागली आहेत.

सलग झालेल्या पराभवांमुळे यावेळी सुखदेव पाटील यांच्याबाबत मतदारांमध्ये मोठी सहानुभूती निर्माण झाली होती. संपूर्ण वायफळे गणात त्यांची जोरदार लाट पाहायला मिळाली. याचाच परिणाम म्हणजे त्यांचा दिमाखदार विजय झाला.

दरम्यान, आमदार रोहित पाटील यांनी या गणात उमेदवारी देताना स्थानिक कार्यकत्यांना विश्वासात न घेतल्याची चर्चा आहे. यामुळे आमदार गटातील दुसऱ्या व तिसऱ्या फळीतील कार्यकर्त्यांनी फारसा प्रचार केला नाही. परिणामी जितेंद्र झांबरे यांना मोठ्या फरकाने पराभव स्वीकारावा लागला.

विजयानंतर सुखदेव पाटील यांच्या समर्थकांनी गावात जल्लोष केला. तर आमदार रोहित पाटील गटातील नाराज कार्यकर्त्यांनीच हा निकाल फिरवल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.