आमदार सुहास बाबर यांच्या प्रमुख उपस्थितीत 4 मे रोजी लेंगरे येथे जिल्हा परिषद, विटा नगरपरिषद व खानापूर पंचायत समिती नूतन सदस्यांचा होणार नागरी सत्कार
विटा प्रतिनिधी : निसर्ग फाऊंडेशन,लेंगरे या संस्थेच्या वर्धापन दिन निमित्ताने सांगली जिल्हा परिषद, विटा नगरपरिषद व खानापूर पंचायत समिती विटा च्या नूतन पदाधिकारी व सदस्यांचा भव्य नागरी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला असून या कार्यक्रमासाठी खानापूर आटपाडी विधानसभा मतदार संघाचे आमदार सुहास बाबर, श्रेयस उद्योग समूहाचे संस्थापक ॲड. बाबासाहेब मुळीक, डबल महाराष्ट्र केसरी पै. चंद्रहार पाटील यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. सोमवार दि.04 मे रोजी हनुमान चौक लेंगरे येथे हा सत्कार समारंभ संपन्न होणार आहे.
या सत्कार समारंभाचे स्वागताध्यक्ष सिव्हिल सर्जन व संस्थेचे कार्यवाह डॉ. विक्रमसिंह कदम, आदर्श जिल्हा परिषद सदस्य व सहकार्यवाह फिरोज शेख यांच्या नियोजनातून हा सोहळा संपन्न होणार आहे.
यावेळी महाराष्ट्र राज्यातील कर्तृत्ववान 11 व्यक्ती व एका शैक्षणिक संस्थेस राज्यस्तरीय 'निसर्ग सन्मान' पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच लोककलेला प्रोत्साहन म्हणून 'गर्जा महाराष्ट्र माझा' या शानदार सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आले आहे अशी माहिती संस्थेचे सचिव नानासाहेब मंडलिक यांनी दिली आहे.