विटा | प्रतिनिधी : ढवळेश्वर येथे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरासमोर भाविकांच्या सोयीसाठी उभारण्यात येणाऱ्या सभामंडपाच्या बांधकामाचे भूमिपूजन आमदार सुहास बाबर यांच्या हस्ते पार पडले. या कामासाठी तब्बल २५ लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, या माध्यमातून मंदिर परिसरात भाविकांसाठी प्रशस्त व सुविधायुक्त सभामंडप उभारण्यात येणार आहे.
ढवळेश्वर येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिराला धार्मिक आणि अध्यात्मिक महत्त्व असून, विविध धार्मिक कार्यक्रम, उत्सव, भजन, कीर्तन तसेच अन्य कार्यक्रमांसाठी भाविक मोठ्या संख्येने मंदिर परिसरात उपस्थित राहत असतात. आमदार सुहास बाबर यांच्या प्रयत्नातून या कामासाठी २५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला असून, आज या कामाचे भूमिपूजन करण्यात आले. या सभामंडपाचा उपयोग भजन, कीर्तन, प्रवचन, धार्मिक उत्सव, सामाजिक कार्यक्रम तसेच विविध सार्वजनिक उपक्रमांसाठी होणार आहे.
याप्रसंगी बोलताना आमदार सुहास बाबर म्हणाले की, ढवळेश्वर येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर हे श्रद्धेचे स्थान असून, मंदिर परिसरात येणाऱ्या भाविकांना आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देणे ही आपली जबाबदारी आहे. सभामंडपाच्या माध्यमातून धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांसाठी चांगली सुविधा उपलब्ध होईल. परिसरातील मंदिरांचा विकास आणि भाविकांच्या सुविधांसाठी आवश्यक तो पाठपुरावा या पुढेही सुरू ठेवण्यात येईल.
यावेळी दिलीप आण्णा किर्दत, उपसरपंच देवानंद किर्दत, चेअरमन अभिजीत किर्दत, डी के नाना, शंकर काका किर्दत, किरण किर्दत, गणेश शिंदे, राजू आण्णा किर्दत, रामचंद्र मामा किर्दत, रघुनाथ आण्णा शिंदे, उत्तम आण्णा किर्दत, पितांबर किर्दत, शंकर नाना किर्दत, बापू किर्दत ,जगन्नाथ किर्दत , महादेव किर्दत, सुरेश किर्दत, धोंडीराम किर्दत, अशोक भाऊ गुरव, सुभाष किर्दत , आन्नू तात्या, आन्नू भाऊ मंडले, भगवान पाटील, उद्धव नाना शिंदे, शंकर शेठ शिंदे , भगवान सकटे, शामराव सकटे,शिवाजी काकडे तसेच मंदिर विश्वस्त, ग्रामपंचायत पदाधिकारी, ग्रामस्थ, भाविक तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
