नेव्हिगेशन मेनू

लेंगरे येथे प्रथमच 'भव्य सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा'

Pramod Bhosale By Pramod Bhosale
| ऑगस्ट २२, २०२६

 


मा.आदर्श जिल्हा परिषद सदस्य फिरोजभैय्या शेख यांचेवतीने स्पर्धेचे आयोजन; सामाजिक व पर्यावरणपूरक उपक्रमांना विशेष महत्त्व


विटा प्रतिनिधी :


निसर्ग फाउंडेशन संस्थेच्या संयोजनातून लेंगरे गावात गणेशोत्सवाच्या उत्साहाला सामाजिक बांधिलकीची जोड देण्यासाठी मा. श्री. फिरोज भैय्या शेख (मा. आदर्श जिल्हा परिषद सदस्य) यांचेवतीने ‘भव्य सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धा २०२६’ चे प्रथमच आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेत प्रवेश विनामूल्य ठेवण्यात आला आहे.



   या स्पर्धेत प्रथम क्रमांकास ₹९,००० व ट्रॉफी, द्वितीय क्रमांकास ₹७,००० व ट्रॉफी, तर तृतीय क्रमांकास ₹५,००० व ट्रॉफी देण्यात येणार आहे. त्यामुळे लेंगरे गावातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांमध्ये या स्पर्धेबाबत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

  सदरची स्पर्धा लेंगरे गावापूर्ती मर्यादित असून, प्रत्येक मंडळाने नाव नोंदणी करणे अनिवार्य आहे. मंडळाकडे गणेशोत्सवाची अधिकृत परवानगी असणे आवश्यक आहे. तसेच गणेशोत्सव काळात मंडळांनी सामाजिक, पर्यावरणपूरक व सेवाभावी उपक्रम राबविणे अपेक्षित आहे. राबविलेल्या उपक्रमांची फोटोसह माहिती निसर्ग फाउंडेशनकडे सादर करावी लागणार आहे. स्पर्धेतील परीक्षकांचा निर्णय अंतिम राहणार आहे.

 २४ ऑगस्ट ते १३ सप्टेंबरपर्यंत नाव नोंदणी चा कालावधी आहे नाव नोंदणीसाठी श्री. सौरभ मंडलिक, SM आपले सरकार सेवा केंद्र, हनुमान चौक, लेंगरे येथे संपर्क साधावा.

संपर्क : ८४८४९६१०७३ / ७२७६४३२१४० / ९८६०६०९९७३

    लेंगरे गावात प्रथमच अशा स्वरूपाच्या सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेचे आयोजन करण्यात येत असून, गणेशोत्सव अधिक सामाजिक, पर्यावरणपूरक आणि सेवाभावी पद्धतीने साजरा करण्याचा या उपक्रमाचा उद्देश आहे. गावातील जास्तीत जास्त गणेशोत्सव मंडळांनी विनामूल्य प्रवेश घेऊन स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन निसर्ग फाउंडेशनचे सचिव नानासाहेब मंडलिक यांनी केले आहे.

  या स्पर्धेच्या आयोजनासाठी जिल्हा शल्य चिकित्सक, सांगली व संस्थेचे कार्यवाह डॉ. विक्रमसिंह कदम, सहकार्यवाह मा. आदर्श जिल्हा परिषद सदस्य फिरोज शेख, सल्लागार प्रा. संजय ठिगळे, प्रा. आप्पासाहेब बागल, सुनिल पाटील, कार्याध्यक्ष नवनाथ सगरे, अध्यक्ष नितीन चंदनशिवे, उपाध्यक्ष डॉ. वैशाली हजारे, खजिनदार भगवान जाधव, प्रमोद भोसले, सुरज मंडले, अभि गायगावळे, जीवन धेंडे, प्रतिक्षा जाधव, सुवर्णा मंडलिक यांचे सहकार्य लाभत आहे.

  ‘भक्तीबरोबर सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरण संवर्धन’ या संकल्पनेतून होणारी ही स्पर्धा लेंगरेच्या गणेशोत्सवाला एक नवा सामाजिक आकार देणारी ठरणार आहे.