सौ. सोनियावहिनी सुहासभैय्या बाबर यांची प्रमुख उपस्थिती : सार्वजनिक मंडळात नागनाथ गणेश मंडळाचा प्रथम क्रमांक तर घरगुती सजावटीत सौ. आशाताई दिनकर दबडे यांचा प्रथम क्रमांक
विटा प्रतिनिधी -
निसर्ग फाउंडेशन लेंगरे संस्थेने प्रथमच घेतलेल्या गौरी गणपती सजावट व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धेचे बक्षीस वितरण सोहळा लेंगरे ग्रामपंचायत येथील लोकनेते निवृत्तीभाऊ बागल सभागृहात संपन्न झाला.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जीवनप्रबोधिनी महाविद्यालयाच्या कार्यवाह सौ.सोनियावहिनी सुहासभैय्या बाबर, सांगली जिल्हा परिषद सदस्या मनिषाताई बागल, मा. आदर्श जिल्हा परिषद सदस्य फिरोजभैय्या शेख, उपसरपंच एजाज देसाई, सर्व सेवा सोसायटीचे संचालक पांडुरंग शिंदे, ग्रामपंचायत सदस्या सुवर्णा पाटील, गोल्ड उद्योजक संतोष शेठ शिंदे, निसर्ग सखी मंच संचालिका गौरी जाधव, यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविकात फिरोजभैय्या शेख म्हणाले की, लेंगरे गावात गणेशोत्सव हा अत्यंत भक्तीभावाने साजरा होतो. गावचा एकोपा या उत्सवाचे वैशिष्ट्य आहे. मंडळांना प्रोत्साहन मिळावे म्हणून ही स्पर्धा आपण घेतली आणि त्यासाठी मोठा प्रतिसाद लाभला. असे प्रतिपादन केले.
जिल्हा परिषद सदस्या मनिषाताई बागल म्हणाल्या की लेंगरे गावातील घरगुती गौरी गणपती सजावटी मध्ये मोठा प्रतिसाद लाभला. पर्यावरणपूरक, टाकाऊपासून टिकाऊ, हरित, स्वच्छ आणि सामाजिक संदेश देणारे देखावे अशी सजावट पाहायला मिळाली महिलांनी अत्यंत कल्पकतेतून सजावट करत स्पर्धेत योगदान दिले.असे मनोगत व्यक्त केले
यावेळी सोनियावहिनी बाबर म्हणाल्या की, निसर्ग फाउंडेशन ही संस्था सातत्याने समाज हितासाठी काम करत आहे. संस्थेचे सर्व पदाधिकारी सक्रिय आहेत. गणेशोत्सवात लोकांना प्रोत्साहन देण्यासाठी घेण्यात आलेल्या या दोन्ही स्पर्धा अत्यंत जबाबदारीने पार पडल्या आहेत. सर्व विजेत्यांचे अभिनंदन असेच योगदान देत रहा असे प्रतिपादन केले.
सांगली जिल्हा परिषद सदस्या सौ. मनिषाताई बागल व युवानेते प्रकाशभाऊ बागल यांच्या सौजन्यातून घरगुती गौरी गणपती सजावट स्पर्धेत प्रथम सौ. आशाराणी दिनकर दबडे,द्वितीय क्रमांक सौ. सविता प्रणव चव्हाण,सौ. संचिता देविदास डिगोळे तृतीय क्रमांक सौ. जयश्री शहाजी बोबडे, सौ.साधना दिपक माळी, उत्तेजनार्थ सौ. सुप्रिया सचिन शिंदे सौ. अक्षदा सुनिल माने यांना सन्मानित करण्यात आले. सांगली जिल्हा परिषदेचे मा. आदर्श सदस्य फिरोजभैय्या शेख यांच्या सौजन्यातून सार्वजनिक गणेशोत्सव स्पर्धेत प्रथम क्रमांक नागनाथ गणेश मंडळ, लेंगरे द्वितीय क्रमांक (विभागून) जयभवानी गणेश मंडळ, लेंगरे,मोरया गणेश मंडळ, लेंगरे,तृतीय क्रमांक (विभागून) श्री.गणेश मित्र मंडळ, लेंगरे,श्री.छत्रपती युवा मंच लेंगरे, उत्तेजनार्थ क्रांती युवा प्रतिष्ठान,लेंगरे यांचा सन्मान करण्यात आला.
सर्व विजेते व सहभागी स्पर्धकांनाकै. वसंत(आण्णा) रामचंद्र शिंदे यांचे स्मरणार्थ श्री. कृष्णदेव(शेठ) वसंत शिंदे व सर्व सेवा विकास सोसायटीचे संचालक श्री.पांडुरंग वसंत शिंदे यांच्यावतीने सन्मान चिन्ह देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक नितीन चंदनशिवे यांनी केले तर आभार सुवर्णा पाटील यांनी मानले. यावेळी संस्थेचे सचिव नानासाहेब मंडलिक, सुरज मंडले, साक्षी जाधव, प्रमोद भोसले, भगवान जाधव, दिपक माळी, वैभव सगरे यांच्यासह महिला, ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.









