Vihann News

आटपाडीचे देशमुख करणार करेक्ट कार्यक्रम; जयंत पाटलांची आज चर्चा

ऑक्टोबर २९, २०२४
जयंत पाटलांची आज चर्चा
कारखान्याचा प्रश्न निकाली निघणार?
 महादेव धनवडे : विधानसभा निवडणुकांचा अर्ज भरण्याचा धडाका चालू असतानाच खानापूर विधानसभा मतदारसंघात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. या मतदारसंघात महायुतीच्या वतीने स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांचे चिरंजीव सुहास बाबर यांनी अर्ज दाखल केला आहे तर महाविकास आघाडीच्या वतीने माजी आमदार सदाशिवराव पाटील यांचे चिरंजीव अँड. वैभव दादा पाटील यांनी अर्ज दाखल केला आहे. त्याचबरोबर आटपाडीचे माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख यांनी काल त्यांच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता यामध्ये जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अमरसिंह बापू देशमुख यांनी आपल्या व्यथा मांडल्या होत्या. त्यामध्ये त्यांनी कारखान्याचा प्रश्न जिव्हारी लागला असल्याचे सांगितले होते. अत्यंत पोट तिडकेने अमरसिंह बापू देशमुख यांनी आपले प्रश्न मांडले होते.
कारखान्याच्या याच मुद्द्यांच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अमरसिंह बापू देशमुख यांना आज 29 ऑक्टोबर संध्याकाळी सहा वाजताची वेळ देण्यात आल्याचे देशमुखांच्या कार्यकर्त्यांकडून सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. त्याचबरोबर यावेळी त्यांच्यासोबत माजी आमदार सदाशिव भाऊ पाटील व वैभव दादा पाटील हे सुद्धा असणार असल्याचे सोशल मीडियाच्या स्टेटस द्वारे व्हायरल होत आहे.