नेव्हिगेशन मेनू

ब्रेकिंग न्यूज : मुंबईत प्रवेश करणाऱ्या पाचही टोल नाक्यांवर टोलमाफी

sbmarathi By sbmarathi
| ऑक्टोबर १३, २०२४


मुंबईत हलक्या मोटार वाहनांच्या प्रवेशासाठी पाचही टोलनाक्यांवर कोणताही टोल आकारला जाणार नाही, अशी घोषणा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी केली. त्याची अंमलबजावणी आज रात्रीपासून सुरू होणार आहे. महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळात या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली आहे. वाशी, ऐरोली, दहिसर, मुलुंड आणि एलबीएस आनंद नगर या टोलनाक्यांवर या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे.
ही टोलमाफी आज रात्री 12 वाजल्यापासून सुरू होणार आहे.