Vihann News
728x90 Ad Slot

दोन वैभव पाटील दोन सुहास बाबर तर तीन रोहित पाटील जिल्ह्यात 'सेम टू सेम' उमेदवारामुळे डोकेदुखी वाढणार

ऑक्टोबर ३०, २०२४

खानापूर मतदारसंघात वैभव पाटील नावाचे दोन, सुहास बाबर नावाचे दोन उमेदवार निवडणूक लढवणार आहेत. तर तासगाव मधून रोहित पाटील नावाचे तीन उमेदवार निवडणूक रिंगणात उतरणार आहेत. नावात साधर्म्य असलेल्या या उमेदवारांमुळे अधिकृत उमेदवारांची डोकेदुखी वाढणार यात काही शंका नाही.

लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांच्या ‘तुतारी’शी साधर्म्य असणा-या ‘पिपाणी’ या चिन्हामुळे शरद पवार गटाला अनेक मतदारसंघात मोठा फटका बसला होता. आता नावात साधर्म्य असणारे उमेदवार मतदारांचा संभ्रम देखील वाढणार आहे. खानापूर मधून वैभव सदाशिव पाटील यांना उमेदवारी मिळाल्यानंतर वैभव प्रतापराव पाटील यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. याशिवाय सुहास अनिलराव बाबर यांनी शिवसेनेकडून उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर  सुहास राजेंद्र बाबर यांनी अपक्ष अर्ज दाखल केला. याशिवाय तासगावातून माजी उपमुख्यमंत्री आर आर पाटील यांचे सुपुत्र रोहित रावसाहेब पाटील यांनी अर्ज दाखल केल्यानंतर रोहित राजगोंडा पाटील (अपक्ष), रोहित राजेंद्र पाटील (अपक्ष) अशा एकाच नावाचे तीन उमेदवार तासगावात तर एकाच नावाचे दोन उमेदवार खानापूर निवडणूक रिंगणात उतरले आहेत. 

तुतारी वाजवणारा माणूस आणि तुतारी या चिन्हांमध्ये साधर्म्य असल्याने राष्ट्रवादी पक्षाचे अधिकृत उमेदवार वैभव सदाशिव पाटील यांना याचा फटका बसेल असे बोलले जात आहे. तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह आणि तुतारी यात साधर्म्य असल्यामुळे आपणाला अधिक मत देखील मिळेल या हेतूने काही उमेदवारांनी आपली पसंती तुतारी या चिन्हाला दर्शवल्याचे दिसून येत आहे. 

खानापूर मतदार संघात आठ उमेदवारांनी तुतारी हे चिन्ह मिळण्यासाठी प्रथम पसंतीचे चिन्ह म्हणून तुतारी या चिन्हाची निवड केली आहे. 
याशिवाय जिल्ह्यामध्ये तासगाव शिराळा इस्लामपूर सांगली या ठिकाणीही अधिकृत उमेदवार यांची डोकेदुखी वाढणार असल्याचे चिन्ह आहेत.

शिराळा
मानसिंग फत्तेसिंगराव नाईक
मानसिंग ईश्वरा नाईक (अपक्ष)
इस्लामपूर 
जयंत राजाराम पाटील
जयंत रामचंद्र पाटील
सांगली
जयश्रीताई पाटील (अपक्ष)
जयश्री (बहिनी) जगन्नाथ पाटील (अपक्ष)
जयश्री मदन पाटील (अपक्ष)
अशाप्रकारे जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी नामसाधर्म्य असणारे उमेदवार उभे केले असल्याने 4 नोव्हेंबर अर्ज माघारी घेण्याच्या तारखेपर्यंत याच्यामधील काही उमेदवार अर्ज माघारी घेतात की मुख्य उमेदवाराची डोकेदुखी वाढवणार याकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.