Vihann News
728x90 Ad Slot

खानापूर विधानसभा निवडणूक होणार हाय व्होल्टेज ड्रामा

नोव्हेंबर ०१, २०२४

राजकारणाची पंढरी म्हणून सांगली जिल्ह्याकडे पाहिले जाते. वसंत दादा पाटील, राजाराम बापू पाटील, पतंगराव कदम, आर. आर. पाटील  असे अनेक दिग्गज नेते हे सांगली च्या मातीत घडले. सांगलीत प्रत्येक व्यक्ती हा कोणत्या न कोणत्या राजकीय पक्ष किंवा गटात नक्कीच असतो तशी सांगलीची यंदाची लोकसभा निवडणूक संपूर्ण महाराष्ट्रा सह देशभरात चांगलीच गाजली होती. राजकारण काय असते हे तेव्हा सांगली करांनी दाखवून दिले होते. आता सांगलीतील खानापूर विधानसभा देखील चांगलीच गाजणार आहे. 

कॉंग्रेस पक्षाचा गड असलेला खानापूर आटपाडी विधानसभा मतदार संघ 2014 च्या निवडणुकीत अनिल बाबर यांनी शिवसेनेच्या गटात दाखल केला. त्यानंतर 2019 साली देखील पुन्हा अनिल बाबर मोठ्या मताधिक्याने विजयी होत दुसऱ्यांदा विधानसभेत दाखल झाले. पुढे जेव्हा शिवसनेत बंड झाले तेंव्हा देखिल अनिल बाबर हे या बंडात शिंदेंसोबत आघाडीवर होते. मात्र जानेवारी महिन्यात त्यांच अकस्मित निधन झालं आणि हा मतदार संघ रिक्त झाला. आता विधानसभा निवडणुकीत एकनाथ शिंदेनी त्यांच्या जागेवर त्यांचे पुत्र सुहास बाबर यांना निवडणुकीच्या मैदानात उतरवले आहे. मात्र त्यांच्या उमेदवारी मुळे शिंदे गटाचा मित्र पक्ष असलेल्या भाजप आणि राष्ट्रवादी कांग्रेस अजित पवार गटाच्या स्थानिक नेत्यांची कोंडी झाल्याची पहायला मिळाली. भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांचे बंधू आणि जिल्हा परिषदेचे माजी सभापती ब्रह्मानंद पडळकर यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला.

 त्यानंतर भाजप मधून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत आटपाडीचे माजी आमदार राजेंदआणा देशमुख सामिल झाले. त्यांनी पक्षाकडून उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न केले. परंतु त्यांना उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांनीही बंडाची भूमिका स्वीकारत अपक्ष अर्ज दाखल केला. तर राष्ट्रवादी कांग्रेस अजित पवार गटाचे वैभव पाटील यांना शरद पवारां कडून पक्षात घेत उमेदवारी देण्यात आली. आता वैभव पाटील हे जरी अजित पवार गटात होते तरी त्यांचे वडील सदाशिव पाटील हे मात्र शरद पवार गटासोबत असल्या मुळे पवारां कडून पाटलांची उमेदवारी फिक्स झाली.

आचारसंहिता लागल्यापासून अर्ज दाखल करण्याच्या शेवटी पर्यंत अगदी नाट्यमय पद्धतीने खानापूर आटपाडी विधानसभा मतदार संघात कोण कोण अर्ज भरणार याकडे मतदारांचे लक्ष लागून होते. आटपाडी तालुक्यातील दोन मातब्बर नेत्यांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केले. त्यांनी केलेली बंडखोरी मतदारसंघात खळबळ उडवत आहे. आटपाडी तालुक्यातील देशमुख आणि पडळकर यांनी काहीही झाले तरी माघार घेणार नाही, असा पवित्रा घेतला आहे. दोन्ही उमेदवारांनी जोमात प्रचार सुरू केला आहे. 

त्यामुले इथली लढत ही सुहास बाबर, वैभव पाटील, राजेंद्र देशमुख आणि ब्रह्मानंद पडळकर अशी चौरंगी होईल की यातील कोणी माघार घेते हे चार डिसेंबर रोजी अर्ज माघारीची प्रक्रिया पूर्ण होईल त्यावेळी स्पष्ट होणार आहे. त्यानंतर खानापूर आटपाडी मतदारसंघातील निवडणूक हाय व्होल्टेज ड्रामा होईल यात काही शंका नाही.