Vihann News
728x90 Ad Slot

कराड रस्ता बनतोय मृत्यूचा सापळा; विट्यात अज्ञात वाहणाच्या धडकेत फौजी युवकासह एक जण ठार

नोव्हेंबर ०२, २०२४

कराड रस्त्यावर भारतीय सैन्य दलात कार्यरत असणाऱ्या 29 वर्षीय फौजी युवकासह आणखी एकाला अज्ञात वाहने धडकले या घटनेने परिसर हदरुन गेला आहे. अज्ञात वाहनाने दिलेल्या या भीषण धडकेमध्ये दोघे ही तरुण जागीच ठार झाले. या दोघांना उडवणाऱ्या अज्ञात वाहन चालकाने घटना स्थळावरुन पलायन केले. कराड रस्त्यावरील काळंम्मादेवी मंदिरा समोर हा भीषण अपघात घडला. 

कडेगाव तालुक्यातील सासपडे या मुळ गावाचे पण भाळवणी येथील त्यांचे मामा संजय हिंदूराव धनवडे यांच्या कडे भाळवणी येथे प्राथमिक शिक्षण घेऊन तेथेच स्थायीक झालेले संकेत राजकुमार पोळ (वय 29) हे भारतीय सैन्य दलात फौजी म्हणून कार्यरत होते त्यांची चंडीगढ़ युनिटला पोस्टिंग होती. व त्यांचे मित्र सुरज ज्ञानदेव जाधव (वय 27) राहणार विवेकानंद नगर हे दोघे तरुण काल लक्ष्मी पूजन दिवशी रात्री 11 वाजण्याच्या सुमारास कराड रस्त्यावर विटा शहराच्या दिशेने येत होते. यावेळी काळंम्मा देवी मंदिरा समोर आल्यावर पाठी मागून आलेल्या अज्ञात चार चाकी वाहनाने दोघाना मागून धडक दिली ही धडक इतकी भीषण होती की या धडकेत सुरज जाधव आणि मिलिटरी मॅन संकेत पोळ यांचा जागीच मृत्यू झाला. या दोन्ही तरुणांना धडक देऊन अज्ञात वाहन चालकाने घटना स्थळावरून पलायन केले. 

याबाबत संजय हिंदूराव धनवडे यांनी विटा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून या दोन्ही तरुणाना धडकनाऱ्या वाहनाचा शोध सुरू आहे. भारतीय सैन्य दलात कार्यरत असणारे संकेत राजकुमार पोळ यांनी दीपावली निमित्त आठवडा भर सुट्टी घेतली होती दोन दिवसांनी 4 नोव्हेंबरला संकेत हे पुन्हा आपल्या सेवेत रुजू होणार होते. परंतु काळाने घाला घातला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या अपघात दोघांचे मृत देह शव विच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत. तर संकेत पोळ यांच्यावर त्याच्या मूळ गावी सासपडे ता.कडेगाव येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

विटा-कराड रस्ता हा विट्याातील सर्वात वर्दळीचा रस्ता आहे. या रस्त्याला दुतर्फा हॉटेल व व्यावसायीक दुकाने आहेत. इस्लामपूर, कोल्हापूर, पुणे, मुंबईला जाण्यासाठी सोयीस्कर म्हणून या रस्त्याला वाहनांची जास्त वर्दळ असते. नेवरी नाका ते भाळवणी फाटा या परिसरात जास्त वरदळ असल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. हा रस्ता मृत्यूचा सापळा बनला असल्याची प्रतिक्रिया नागरिकांतून उमटत आहे. याकडे प्रशासनने लक्ष घालावे अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.