Vihann News
728x90 Ad Slot

महाराष्ट्रातील जनतेला दोन बायकांचे सरकार कसे चालते

फेब्रुवारी १०, २०२५
"साहित्याला जात नसते, सत्यावर आधारलेले साहित्यच प्रशासनीय" – डॉ. श्रीपाल सबनीस
४३व्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष पदावरून बोलताना ज्येष्ठ साहित्यिक डॉ. श्रीपाल सबनीस यांनी संविधान, इतिहास, शिक्षण आणि समाजव्यवस्थेवर परखड विचार मांडले.
ते म्हणाले, “भारताचे संविधान जात मानत नाही, मग साहित्याला जात कशी असू शकते? जातीय व्यवस्थेपेक्षा वर जाऊन निखळ मनाने प्रकट होणारे साहित्यच उदात्त आणि पवित्र असते.” साहित्य हे माणसाला जोडणारे असावे, विभाजन करणारे नाही, लेखक, कवी आणि अभ्यासक हेच खरे परिवर्तन घडवणारे असतात. इतिहासातील प्रत्येक उठावाच्या मागे साहित्यिक, कवी किंवा एखादा अभ्यासक असतो, कारण समाजाला दिशा देण्याचे सामर्थ्य साहित्यामध्ये आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
“महात्मा गांधी यांची हत्या करणारा नथुराम गोडसे हा हिरो कसा होऊ शकतो? जगाने गांधींना महात्मा मानले,” असे सांगत त्यांनी इतिहासाचे विकृतीकरण रोखण्याची गरज व्यक्त केली. नेल्सन मंडेला आणि बराक ओबामा यांसारख्या जागतिक नेत्यांनी गांधींच्या विचारांचा आदर केला. गांधी भारतात जन्मले नसते, तर मी आज अमेरिकेचा राष्ट्राध्यक्षही झालो नसतो, असे ओबामा म्हणाले होते,” हे उदाहरण देत त्यांनी गांधींच्या जागतिक प्रभावावर प्रकाश टाकला.
      गांधी आणि आंबेडकरांचा भारत एकच आहे, असे ठामपणे सांगत त्यांनी इतिहास शिक्षणाच्या जबाबदारीवर भर दिला. “इतिहास फक्त शिकवू नका, तर जबाबदारीने शिकवा, कारण पुढच्या पिढीचे भवितव्य या इतिहासावर अवलंबून आहे,” असे त्यांनी शिक्षकांना उद्देशून सांगितले."समाज सुशिक्षित झाला, पण सुसंस्कृत होण्यासाठी अशी साहित्य संमेलने महत्त्वाची भूमिका बजावतात,” असे सांगत त्यांनी शिक्षण आणि संस्कार यांचा समतोल साधण्याची गरज व्यक्त केली. सत्याला मरण नाही, सत्तेला मरण आहे. सत्यावर आधारलेले साहित्य हेच टिकणारे आणि प्रशंसनिय आहे,” असे ते म्हणाले.
        नवी पिढी घडवताना पालक, शिक्षक आणि संपूर्ण समाजाने आत्मपरीक्षण करावे, असा महत्त्वपूर्ण संदेश देत साहित्यिक रघुराज मेटकरी यांना सांस्कृतिक सेवक असे गौरवोद्गार काढताना त्यांनी सामाजिक बांधिलकीचे महत्त्व अधोरेखित केले. मराठी शाळा बंद पडते याला पालक जबाबदार आहेत.राजकारणातील संवाद संपल्याची भावना व त्यातील संवाद पुन्हा स्थापित करण्याची क्षमता साहित्यात आहे. शेतकऱ्याचे अर्थकारण कुठे बिघडले आहेत याचा शोध घेणे व सरकारला जाब विचारण्याची गरज साहित्यात असली पाहिजे सत्य सेवा व माणुसकीचे राजकारण हवे ही मागणी परखरपणे त्यांनी मांडली विकृत इतिहास मांडणाऱ्यांना सुनावले. लायकी नसणारे मंत्री सरकार कसे चालू शकतात हे जनतेने विचारले पाहिजे एका मंत्र्यांनी शेतीचे साहित्य बाजार भाव पेक्षा जास्त दराने विकत घेतली तरी त्या मंत्र्याबद्दल काहीच सरकार बोलत नाही हे का? मोदी पैसे खात नाही तर भ्रष्टाचार करणारे नेते त्यांना सरकारमध्ये कसे चालतात असा परखड सवाल सबनीस यांनी मांडला. साहित्य संमेलनाचे उद्घाटक ओम प्रकाश शेटे म्हणाले की माणसे जोडणे महत्त्वाचे आहे सामान्य माणसे ही सर्वात मोठी संपत्ती आहे साहित्य संमेलनाचा राजकारणातील दरारा नवीन साहित्यामुळे कमी झाला आहे तो वाढवणे गरजेचे आहे जुने राजकारणी लोक साहित्यिकांना घाबरत होते पण आत्ता ते दिसत नाही मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यामुळे मराठी भाषा ४५० विद्यापीठात शिकवली जाणार आहे व अनेक मराठी संस्थांना पाठबळ मिळणार आहे.त्यामुळे मराठी जगाच्या कानाकोपऱ्यात पोचणार आहे.व भाषेचे कौतुक होणार आहे. यावेळी स्वागताध्यक्ष डॉ.दिनकर पाटील व डॉ महादेव सगळे यांनी आपले विचार मांडले यावेळी व्यासपीठावर रघुराज मेटकरी डॉ. ऋषिकेश मेटकरी उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ. ऋषिकेश मेटकरी सूत्रसंचालन डॉ. ज्योत्स्ना मेटकरी चंदना तामखडे यांनी मांडले यावेळी रवींद्र बेडकीहाळ एड.सुभाष पाटील डॉ. मानाजी कदम डॉ. प्रताप वलेकर ऍड विनोद गोसावी, ऍड. महेश शानबाग, डॉ गिरीश शरणाथे अब्बास मुलांनी, दत्ता खंडागळे, डी ए माने शकुंतला पाटील हृदयनाथ सावंत बाळासाहेब पाटील अरुण लंगोटे ज्ञानेश्वर लाटणे
.किसन जाधव पांडुरंग शितोळे इत्यादी मान्यवर उपस्थित होते साहित्य संमेलन यशस्वी करण्यासाठी योगेश्वर मेटकरी ऋषिकेश मेटकरी हर्षवर्धन मेटकरी राजू गारोळे तात्यासो शेंडगे राहुल बल्लाळ सागर कचरे पांडुरंग होनार कार्यक्रमाचे आभार तात्यासाहेब शेंडगे यांनी मांडले