Vihann News
728x90 Ad Slot

बीजेपी पापण्या लावायच्या आत संपेल; का संतापला कट्टर भाजप समर्थक

जून १८, २०२५
विटा : २६ वर्षापासून बिजेपीचा कट्टर कार्यकर्ता असलेले विट्यातील प्रतिथयश उद्योजक प्रशांत राठोड यांनी भारतीय जनता पक्षात काँग्रेस पक्षातील नेते सामील होत असल्याने तीव्र संताप व्यक्त केली आहे.

सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी माझ्यासारखे लाखो करोड लोक आहेत जे हिंदुत्व आणि प्रथम देश या बेसवर काम करत आहेत. काळ बदलला एका शिटवरून पूर्ण देशामध्ये भाजपची सत्ता आली आहे. याचा अभिमान आहे.  मोदी सरकार चांगले निर्णय घेत आहे. एका पक्षाचा कार्यकर्ता म्हणून, सामान्य कार्यकर्ता म्हणून आत्ताची जी अवस्था आहे. आमच्या मनात खूप खदखद आहे. ती आम्ही कोणापुढे व्यक्त करावी आम्हा सामान्य कार्यकर्त्याच्या वेदना कोणाला सांगाव्यात. आमचे कोणी ऐकायला तयार नाही. कोणी ऐकून घ्यायला तयार नाही. कारण आम्ही ज्यांना सांगतोय त्यांच्यावर पण सध्या आता पक्ष अंतर्गत दबाव आहेत. जेव्हा निवडणुका होतात आम्ही प्रत्येक कार्यकर्ते दारोदारी जाऊन पक्षासाठी  काम करत असतो. कोणी कुठल्याही जाती धर्माचा असो आम्ही सगळ्यांकडे जातो. हे फक्त आम्ही कार्यकर्ता म्हणून या सगळ्या गोष्टी करत असतो.

२०१४ ला जेव्हा भाजप सत्तेत आली तेव्हा आम्हाला वाटलं की आता आमचे चांगले दिवस आले. आमच्याकडे थोडफार लक्ष दिल जाईल. पण, पक्षाने आमच्याकडे लक्ष दिलं नाही. दुसरी टर्म आली, आता तिसरी टर्म आली सगळीकडे आपण सत्तेत असून सुद्धा कार्यकर्त्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष आहे. आम्ही काय परत सतरंज्याच उचलायच्या?

आता फडवणीस सरकार आहे महणजे फडवणीस, बावनकुळे, चंद्रकांत दादा आहेत तुम्ही तिघ म्हणजे काय पक्षाचे मालक आहात का? पक्ष कुणा एकाच्या बापाचा नाहीये पक्ष हा आमच्या सारख्या कार्यकर्त्यांच्या जीवाचा पक्ष आहे. तो आणि सगळे निर्णय तुम्ही घेताय अहो कशाला सगळा पूर्ण भरणा काँग्रेसचा बीजेपीत आहे. भारतीय जनता पार्टी आहे की काँग्रेस राष्ट्रवादीची पार्टी हे आम्हाला कळेना झाले आहे. काही कार्यकर्ते असे आहेत सायकलवरून तुमचा प्रचार करतेत तुमच्यासाठी जीवाच राण केलं त्या माणसानी स्वतःचा वेळ दिला आज ती माणसं भीक मागायला लागलेत. आणि आज तुमच्या जवळ कोण आहे. ज्यांनी पक्षाला विरोध केला. ज्यांनी मत द्यायची नाही सांगितल. शपता घेतल्या, जी चमकेगरी करतात हे तुमच्या जवळ आणि जो आमच्यासारखा निष्ठावान कार्यकर्ता आहे खूप धगधगते ह्या गोष्टी मुळे आणि प्रत्येक ठिकाणी प्रत्येक कार्यकर्त्याच्या बाबतीत हेच आहे. ठराविक वरच्या पहिल्या फळीतला जरी नेता असला तरी त्यांच्या बाबतीत हेच आहे. कधी होणार एक वेळ असं होईल काँग्रेस अजून संपलेली नाही पण बीजेपी पक्ष असं पापण्या लावायच्या आय संपेल. मूळ कार्यकर्ता जर संपला भाजपातून बाहेर पडला तर पक्षाने विचार करायवा लागेल आणि हे कुणाचे आहे तो हे जे काँग्रेस मधून किंवा इतर पक्षातून जे बीजेपीत आलेले आहेत उद्या जिकडे सत्ता आहे ते तिकडेच जाणार हे तुमचे राहणार आहेत का? तुम्हाला सांगायचं कोणी जाब विचारायचा कोणी जर ह्या महिना दोन महिन्यामध्ये या बाबतीत पक्षाने कार्यकर्त्याच्याकडे लक्ष दिलं नाही तर मी तुम्हाला सांगतो मुंबई या ठिकाणी बीजेपी कार्यालया समोर मी उपोषणाला बसणार आहे आणि माझ्या सोबत अनेक लोक येतील.  याला फक्त जबाबदार आहे ते आता पक्ष चालवणारे लोक. ज्या विचारधारेला आम्ही विरोध केला त्या लोकांच्या खाली आम्हाला काम करायची इच्छा नाही. ते लोक आता आमच्या डोक्यावर तुम्ही बसवली. का आम्ही त्यांचं काम करायचं? का त्यांच्या ज्या लोकांनी पक्षासाठी काहीच नाही योगदान अशी लोक आज आमच्या डोक्यावर आहेत. सगळे निर्णय तेच आहेत आम्ही काय करायचं आमची काय बायका पोरं नाहीत? आम्हाला प्रपंच नाही? आम्हाला देश पाहिजे कारण देश सुरक्षित तर आम्ही सुरक्षित आमच सगळं योगदान चालू आहे पक्षा पक्षाच्या मेन कार्यकर्त्यांना मेन वरच्या लोकांना विनंती आहे तुम्हाला कार्यकर्त्यांकडे लक्ष द्या. नाही दिलं तर लक्षात घ्या येणारा काळ तुमचा नसणार आहे. आणि आमचा पण नसणार आहे. तिसऱ्याच्या हातात जाणार आहे. आज ७० वर्षाची सत्ता आपण उलटली मान्य आहे.  पण तो काळ यायला फार वेळ लागणार नाही.  आज मेजॉरिटी असताना सुद्धा आमच्यावर अन्याय होत असेल.
आजचा विषय जयश्रीताई पाटील ज्या काँग्रेसच्या एकनिष्ठ त्या आज बीजेपीत आहेत. म्हणजे आम्ही त्यांची परत सेवा करायची. पिढ्यान पिढ्या हेच चालायचं. परत जे ठराविक चेहरे आहेत जे पिढ्यान पिढ्या आलेत प्रस्थापित तेच आहेत कुठल्याही पक्षात गेलं तर तेच आहे. मग बदल होणार आहे का नाही? लक्षात असू द्या शिवसेनेच्या दोन शिवसेना झाल्या राष्ट्रवादीच्या ज्या दोन राष्ट्रवादी झाल्या त्या पद्धतीने मूळ विचार भाजपची वेगळी पडेल आणि हे कन्वर्टेड ही वेगळी पडेल याला फक्त जबाबदार तुम्ही आहात. ही लोकशाही आहे हुकुमशाही नाही आणि आम्हाला वेगळा निर्णय घ्यायला तुम्ही भाग पाडू नका एक ठिनगी सुद्धा सगळ जंगल नष्ट करू शकते. 
अश्या शब्दात प्रशांत राठोड यांनी सांगली जिल्ह्यात विशेषतः विट्यातील भाजप प्रवेशाचा सोशल मीडियावर विरोध दर्शविला आहे.  एका सामान्य कार्यकर्त्याची खदखद त्यांनी व्यक्त केली आहे.